पिंपरी,दि.१७ डिसेंबर २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री) यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दि. १८ डिसेंबर २०२५ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्जांचे वितरण व स्वीकृती करण्यात येणार असून, हे अर्ज मा. अजिजभाई शेख यांच्या मध्यवर्ती कार्यालय, पिंपरी येथे उपलब्ध असणार आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करणे, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देणे हा या प्रक्रियेचा उद्देश असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज घ्यावेत व विहित प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्जासंदर्भात अधिक माहितीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
के. एम. बुक्तर : ९३७३३०६८८५
दयानंद वाघमारे : ७७४५८१६४७
ही माहिती पिंपरी चिंचवड शहराचे दोन्ही निरीक्षक मा. अजिजभाई शेख (प्रदेशाध्यक्ष, वाहतूक आघाडी)
मा. बाळासाहेब भागवत (उपाध्यक्ष, महाराष्ट्र)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)यांच्या वतीने देण्यात आली आहे.






