किवळे,दि.२२ नोव्हेंबर २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – प्रभाग क्रमांक १६ मधील किवळे, रावेत, मामुर्डी, विकासनगर, साईनगर, गुरुद्वारा व वाल्हेकरवाडी परिसरातील महिला भगिनींसाठी सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनतर्फे “सन्मान स्त्रीशक्तीचा – न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा विशेष उपक्रम येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केला आहे. युवा नेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या वाढदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वाजता मुकाई चौक, किवळे येथील गुप्ता मैदानावर कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम क्रमांकासाठी असलेले चारचाकी कार बक्षीस, जे प्रभागातील महिलांसाठी प्रथमच ठेवण्यात आले आहे. तसेच द्वितीय क्रमांकास एक्टिवा व LED टीव्ही, तृतीय क्रमांकास फ्रिज, तर चतुर्थ क्रमांकास वॉशिंग मशीन अशी इतर मुख्य बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय शिलाई मशीन, कुलर, OTG, डिनर सेट यांसह 20 लकी ड्रॉद्वारे विविध गृहउपयोगी वस्तूंचे वितरण केले जाणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला एक खास भेट देण्यात येईल. परंतु गिफ्टसाठी कुपन अनिवार्य असून विजेत्यांनी आधार कार्ड व मतदान ओळखपत्राची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा व साईनगर परिसरातील 15 पेक्षा जास्त महिलांचा समूह असल्यास बसची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
9822132069 / 9922529999 / 9119554499 / 9112272724
शिवसेना प्रभाग क्रमांक 16 च्या तरुण व सुशिक्षित उमेदवार सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस (B.Sc.) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडणार असून महिलांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.




