Home ताज्या बातम्या अखेर वंचित बहुजन आघाडीला शहराध्यक्ष पदासाठी स्वच्छ, जनसंपर्कात पुढे असलेला चेहरा मिळाला

अखेर वंचित बहुजन आघाडीला शहराध्यक्ष पदासाठी स्वच्छ, जनसंपर्कात पुढे असलेला चेहरा मिळाला

0

वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड नवी शहर कार्यकारिणी जाहीर; नितीन गवळी यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी

चिंचवड,दि.२० नोव्हेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीला पिंपरी चिंचवडमध्ये अखेर असा शहराध्यक्ष पदाचा चेहरा मिळाला आहे, ज्यांची प्रतिमा स्वच्छ असून जनसंपर्काचा व्यापक पाया आहे. संघटनात्मक कामात सातत्य, कार्यकर्त्यांतील लोकप्रियता आणि नागरिकांशी असलेला घट्ट संपर्क पाहता पक्षाने हा निर्णय घेतल्याचे समजते

वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड महानगर शहराची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून, पक्षाने अखेर स्वच्छ प्रतिमा असलेल्या नितीन गवळी यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तरुणाईला संघटित करण्याची क्षमता, शांत नेतृत्वशैली आणि पक्षनिष्ठा या गुणांच्या जोरावर गवळी हे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे नवे चेहरा म्हणून उदयास आले आहेत.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार तीन स्तरांमध्ये विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महासचिव, उपाध्यक्ष, सचिव, संघटक आणि सदस्य या पदांवर एकूण ४७ पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

नितीन गवळी – नव्या पिढीचा विश्वासार्ह चेहरा

नितीन गवळी यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीला एक सक्षम, स्वच्छ आणि जनहितवादी नेतृत्व मिळाले असल्याची भावना पक्षात व्यक्त होत आहे.
युवा पिढीला पक्षाशी जोडण्याची क्षमता तसेच शहराच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांवर त्यांची सक्रिय भूमिका ही त्यांच्या निवडीची प्रमुख कारणे असल्याचे पक्षस्तरावरून सांगितले जात आहे.

पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही ही नियुक्ती स्वागतार्ह ठरत असून, पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एक नवा दिशादर्शक टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पदाधिकाऱ्यांची विस्तृत यादी जाहीर

नवीन कार्यकारिणीत प्रमुख पदांवर खालील पदाधिकारी नियुक्त:

नितीन गवळी – अध्यक्ष

राजेंद्र साळवे – कार्याध्यक्ष

संजीवन कांबळे, जितेंद्र मोटे – महासचिव

दीपक भालेराव, मल्लिनाथ नोल्ला, दत्ता कांबळे यांच्यासह १२ उपाध्यक्ष

इमाम शेख, प्रितम कांबळे आदी ५ सचिव

२४ संघटक

११ सदस्य

ही कार्यकारिणी मोठ्या प्रमाणात युवक, सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांना संधी देणारी ठरली आहे.ऐन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची निवडणुकीची धामधुम सुरु होणार अध्यक्ष विना हि निवडणुक होती की काय? असा सवाल घुमत असताना आज शहरध्यक्ष जाहीर करण्यात आला.त्यामुळे वंचितच्या कार्येकर्त्यान मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शहराचा चेहरा बदलण्याची क्षमता – पक्षाचा विश्वास

वंचित बहुजन आघाडीच्या नव्या रचनेमुळे शहरात जनआंदोलन, संघटनबांधणी आणि नागरिकांशी थेट संवाद वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नितीन गवळी यांच्यामध्ये शहराचा “चेहरा मोहरा बदलण्याची ताकद आहे”, असे मत पक्षातील वरिष्ठांकडून व्यक्त होत असून, त्यांच्या नेतृत्वात पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − five =

error: Content is protected !!
Exit mobile version