संभाव्य उमेदवारांमध्ये उत्सुकता; “प्रजेचा विकास” न्यूज पोर्टलकडून सर्वात जलद अपडेट्स!
पिंपरी चिंचवड,दि.१ नोव्हेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राज्यातील बराच काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा अखेर पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
या निवडणुकीत ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४७ नगर परिषदा आणि १४७ नगर पंचायतींचा समावेश आहे. आयोगाने सर्व तयारी जवळपास पूर्ण केली असून जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले आहे.
पहिला टप्पा (संभाव्य वेळापत्रक)
६ नोव्हेंबर: निवडणुकीची अधिकृत घोषणा
३ डिसेंबर: नगर परिषद आणि नगर पंचायत मतदान
९ डिसेंबर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान
११ डिसेंबर: दोन्ही निवडणुकांची मतमोजणी
दुसरा टप्पा (संभाव्य वेळापत्रक)
१० डिसेंबर: महापालिका निवडणुकीची घोषणा
७ जानेवारी: राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान
९ किंवा १० जानेवारी: मतमोजणी
११ जानेवारी: निवडणूक कार्यक्रमाची सांगता
या ठिकाणी पार पडणार निवडणुका
संस्था संख्या
महापालिका २९
नगर परिषदा २४६
नगर पंचायती ४२
जिल्हा परिषदा ३२
पंचायत समित्या ३३६
राज्य निवडणूक आयोगाने या वेळेस निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसह नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुका होतील, तर दुसऱ्या टप्प्यात शहरी भागातील महापालिका निवडणुका पार पडतील.
मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच दिवशी होणार असल्यामुळे राजकीय हालचालींना आता गती येण्याची शक्यता आहे.
संभाव्य उमेदवारांमध्ये वाढलेली हालचाल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच संभाव्य उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात संपर्क मोहीम सुरू केली आहे. सामाजिक माध्यमांपासून ते स्थानिक कार्यक्रमांपर्यंत सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“प्रजेचा विकास” न्यूज पोर्टल या निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. संभाव्य उमेदवार, पक्षीय कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेसाठी विश्वसनीय, वस्तुनिष्ठ आणि सर्वात जलद अपडेट्स आम्ही देत राहू.
📰 आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील निवडणुकीसंबंधी ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी — “प्रजेचा विकास” न्यूज पोर्टलला रोज भेट द्या.
📱 स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा प्रत्येक पलभर अपडेट — आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम!



