चिंचवड, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सह-शहर अभियंता श्री. देवन्ना नरसिमलू गटुवार यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता समारंभाचा कार्यक्रम काळेवाडी बीआरटी रोडवरील रागा पॅलेस येथे उत्साहात पार पडला.
गेल्या ३४ वर्षे ९ महिन्यांच्या अखंड, प्रामाणिक आणि समर्पित सेवेनंतर श्री. गटुवार ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. शहराच्या पायाभूत विकासात, रस्ते-विकास, पूल उभारणी आणि शहरी नियोजन क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल या सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप व इतर मान्यवरांनी गटुवार यांच्या कार्याचा गौरव करत म्हटले की, “त्यांची प्रामाणिकता, नियोजनशक्ती आणि कार्यनिष्ठा भावी अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
कार्यक्रमात सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात शहर विकासातील त्यांच्या योगदानाला सर्वांनी मनःपूर्वक सलाम केला.
‘प्रजेचा विकास न्यूज’ परिवाराकडून श्री. देवन्ना नरसिमलू गटुवार यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!



