पिंपरी,दि.०७ ऑक्टोबर २०२५ प्रजेचा विकास न्यूज तिनिधी):-महाराष्ट्र शासनाने राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री. शेखर सिंह (भाप्रसे) यांची बदली करून त्यांची नियुक्ती आयुक्त, कुंभमेळा, नाशिक या पदावर केली आहे. या संदर्भातील शासन आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.या आदेशावर अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी स्वाक्षरी केली असून, शेखर सिंह यांनी आपल्या विद्यमान पदाचा कार्यभार श्री. श्रावण हर्डीकर, भाप्रसे यांच्याकडे सोपवून नाशिक येथे कुंभमेळा आयुक्त म्हणून तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत
पिंपरी-चिंचवडमध्ये उल्लेखनीय कामगिरी
शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्य करताना शहरातील विकासकामांना गती दिली. त्यांच्या कार्यकाळात
शहरी वाहतूक सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना मिळाली,
ई-गव्हर्नन्स व नागरिक सेवा केंद्रांद्वारे पारदर्शक प्रशासनाचा नमुना निर्माण झाला,
तसेच पर्यावरणपूरक उपक्रम, रस्ते-विकास आणि स्वच्छतेबाबत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या.
त्यांच्या नियोजनबद्ध आणि परिणामकारक कार्यपद्धतीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रकल्प गतिमान झाले होते.
नवीन जबाबदारी – नाशिक कुंभमेळा
शासनाने आता त्यांच्यावर नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत धोरणात्मक मानली जात असून, त्यांच्या प्रशासनातील अनुभवाचा मोठा फायदा नाशिकला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या आदेशात नमूद केल्याप्रमाणे बदलीनंतर कार्यभार हस्तांतरणाच्या सर्व प्रक्रियांचे पालन करून Supremo प्रणालीवरील ER Sheet मध्ये Posting कॉलम अपडेट करणे आणि ई-ऑफिस व e-HRMS चा वापर वाढविणे आवश्यक आहे.
या आदेशावर सह सचिव (सुभाष उमराणीकर) यांनी स्वाक्षरी केली असून, संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्य मुद्दे :
शेखर सिंह यांची बदली — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवरून
नवीन जबाबदारी — आयुक्त, कुंभमेळा, नाशिक
कार्यकाळात विकास, पारदर्शकता आणि प्रशासनात वेगळा ठसा
आदेश — सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई (७ ऑक्टोबर २०२५)





