देहुरोड,दि.३१ जुलै २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत व्हावा यासाठी आज खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केला
महाराष्र्टातील इतर कॅन्टोन्मेंट बोर्डाप्रमाणेच देहूरोड कँटोन्मेंटचाही स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच स्वतंञ नगरपरिषदेची मागणी केली जात आहे.अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत. अनेक वर्षांपासून नागरी सुविधा, विकास आराखडे यामध्ये अडथळे येत आहेत.निधीचा अपुरा पुरवठा या मुळै नागरीकांची गैरसोय होत आहे.देहु नगरपरिषदेत किंवा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विलीनीकरण झाल्यास नागरी सुविधांच्या अडचणी काही प्रमाणात थांबेल, अशी जनतेची भावना आहे. दुसरीकडे, काही स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि माजी कॅन्टोन्मेंट सदस्य हे देहूरोडचा स्वतंत्र नगरपरिषद म्हणून विकास व्हावा, अशी मागणी करीत आहेत.
“राज्य शासनाने व संरक्षण मंत्रालयाने देहूरोडकडेही तत्काळ द्यावे व योग्य निर्णय घ्यावा,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या स्थितीबाबत देहूरोड येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजनही करण्यात आले.त्यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी विविध मते सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित व्यक्त होत आहेत.मावळचे खासदार श्रीरंग बारणे,मावळचे आमदार सुनिल शेळके,चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना भेटुन मागणीचे पञ देण्यात आले,व देहुरोड स्वतंञ नगर परिषदेची मागणी करण्यात आली.व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यबाबत निर्णय झाला.व भेट घेऊन स्वतंञ देहुरोड नगरपरिषदेची मागणी करण्यात येईल.२०२२ च्या शासन निर्णयात विलीनीकरणाचा उल्लेख होता, मात्र कँटोन्मेंटने स्वतंत्र राहण्याचा प्रस्ताव दिला आहे.
देहूरोड बाजारपेठ मोठी आहे, मतदारसंख्याही अधिक आहे. नगरपरिषद झाली, तर ७ नगरसेवकांची रचना शक्य आहे. निधीही अधिक मिळेल. केवळ कँटोन्मेंट ग्रामीण नाही; तर देहूरोड शहराचाही विचार व्हावा.असे मत नागरीकांनी व्यक्त केले आणि किन्हई गावात अखेर अन्नत्याग उपोषण देखील झाले.या सर्वात खासदार श्रीरंग बारणे कट्टर समर्थक स्वताला म्हणारे सागर लांगे ह्यानी देहुरोड नगरपरिषदेची स्वतंञ मागणीचा सुर मांडला.सुरवात केली.श्रीरंग आप्पा बारणे आमचे आहेत माझे ऐकतील आणि देहुरोड करांना स्वतंञ देहुरोड नगरपरिषदेची मागणी संसद भवनात करतील माञ सर्व आशा अंकाक्षावर माञ पाणी फिरले आणि थेट मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ३० जुलै २०२५ रोजी संसदेत देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत करावा आणि केंद्र सरकारने वेळच्या वेळी कॅन्टोनमेंट बोर्डाला आर्थिक सहाय्य करावे,अशी मागणी केली.देहुरोड करांचा भ्रम निराश केला.
आता श्रीरंग बारणे कट्टर समर्थक काय निर्णय घेणार देहूरोड नगरपरिषद स्वतंत्र मागणी करत राहणार देहूरोड नगरपरिषद स्वतंत्र मागणी करणाऱ्यांबरोबर राहणार की महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सोबत राहणार खरं पाहिलं तर देहूगाव नगरपरिषद निर्माण झाले आहे. तेव्हाच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड देखील देहुगाव नगर परिषदेत समाविष्ट करून घेणे गरजेचे होते. मात्र बोर्डाने त्यावेळेस सहमती न दर्शविल्याने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच राहिले देहुगाव संत तुकाराम महाराज देवस्थान व देहूगाव वरून पंढरपूर कडे जाणाऱ्या पालखी मार्ग हे सर्व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सलग्न असून देहूरोड बाजारपेठ सोडली तर इतर गावांचा देहुगा बाजारपेठ व देहूगाव जवळ असणारे गावे यांचा भौगोलिक विचार केला तर देहुगाव नगरपरिषदेत गावांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे देहूगाव नगर परिषदेचा देखील आर्थिक कणा मजबूत होईल आणि देहूरोडकरांना नागरी सुविधा मिळण्यास मदत होईल मात्र याचा विचार न करता यापलीकडे महानगरपालिकेत गाव समाविष्ट झाल्याने आपलं काय फायदा होईल याकडे सर्व बड्या नेत्यांचे लक्ष आहे. पण देहूरोड महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने आमचा निभाव लागणार नाही असा देहूरोड मधील नेत्यांचा प्रश्न आहे. मात्र देहूगाव नगर परिषदेमध्ये जर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश झाला तर सर्व नागरिकांना दिलासा मिळेल असे संकेत दिसत आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा निभाव लागतो की मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांचा निभाव लागेल स्वतंत्र देहूरोड नगरपरिषद व्यतिरिक्त देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश देहूगाव नगर परिषदेत होतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नेत्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण आहे.यावर बोर्ड प्रशासन व केंद्रीय प्रशासन मात्र उदासीन आहे.




