Home ताज्या बातम्या किवळे-के व्हिला समोरील कचरा प्रकल्प हटाव बाबत नागरिकांचा मोठा रोष-अ‍ॅड.आशिष देशपांडे,मुंबई हायकोर्ट

किवळे-के व्हिला समोरील कचरा प्रकल्प हटाव बाबत नागरिकांचा मोठा रोष-अ‍ॅड.आशिष देशपांडे,मुंबई हायकोर्ट

0

किवळे,दि.२८ जुलै २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- किवळे-रावेतच्या के-विले हौसिंग सोसायटीचा कचरा संकलन केंद्राला तीव्र विरोध होत आहे.किवळे-रावेत गावच्या सीमेवरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, कचरा डेपो अन्यत्र हलविण्याची मागणी, रस्त्यावर उतरण्याचा इशारा; भटके कुत्रे, जनावरे, डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिक हैराण आहेत.

महापालिका प्रशासनाने मनमानी करून येथे कचरा डेपो उभारण्याचा घाट घातला आहे, त्याला नागरिकांसह सर्वांचा विरोध आहे. कचरा डेपो तात्काळ इतरत्र हलवावा, असे पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.अंदोलन केले आहे.माञ प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्याने आम्ही मंबई हायकोर्टात चालो आहे.नक्कीच यश नागरीकांच्या बाजुने लागेल न्यायदेवता न्याय करतील आणि कचरा संकलन डेपो हाटवला जाईल असा ठाम विश्वास आहे.अ‍ॅड डाॅ.अशिष देशपांडे यांच्या माध्यमातुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहोत कोणत्याही परमिशन घेतल्या नाहीत, सर्वोच्च न्यायालय म्हणते की पब्लिक इफेक्ट होत असले तर त्यांच्या पत्राची दखल घ्याला पाहिजे, ऑर्डनस फॅक्टरी देहुरोड मध्ये काही इफेक्ट झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण किवळेला भोगावं लागेल, उच्च न्यायालय आमचं एकूण घेईन आणि लोकांच्या बाजूने निकाल देईल.

आमदार, खासदार यांचं पण पालिकेने ऐकलं नाही,नागरिकांनी फ्लॅट महागाचे घेतले.जेष्ठ नागरिक,सकाळी वाॅकींग करणारे नागरिक व लहान मुले शेजारील सोसायटीत व जवळपास राहतात. कचरा प्रकल्प योग्य नाही.प्रशासन असल्याने पालिका आयुक्त अनेक वर्षांपासून आहेत.प्रदूषण मंडळाचे एक खाते पालिकेत पण आहे.कचरा पेटी जगातील सर्वात मोठा व्हायरस, मी म्हणेल तो कायदा असं पालिकेत सुरु आहे, आयुक्त चुकलेत की नाही हे मी बोलणार नाही.वकील देशपांडे पञकार परिषदेत बोलत होते या वेळी धर्मापाल तंतरपाळे, निलेश तरस, शाम भोसले, राजेंद्र तरस, सुदाम तरस.प्रविण पाटील, सुधाकर पाटील, सुनील प्रधान,कुंडलिक आम्ले उपस्थित होते.

पालिका अधिकाऱ्यांनी कल्पना न देता चुकीच्या पद्धतीने प्रकलपाचे काम सुरु, ऑर्डरन्स फॅक्टरीने पण पालिकेला पत्र दिले की सुरक्षितातेच्या दृष्टीने हे योग्य नाही.आयुक्त स्वभाव भेटले पण दोन मिनिटे पण बोलले नाही. बिल्डर फ्लॅट विकून मोकळा झाला आहे. कॅन्टोन्मेंट च्या जागा पालिकेने काही डेव्हलप केल्या आहेत, पालिका अधिकारी संजय कुलकर्णी दादागिरी टाईप बोलत आहे. आमदार, खासदार यांचं ऐकत नाही, वाचनालय, क्रिडांगण, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरु करत नाही तुलतेत रावेत चा विकास झाला आहे, याला जबाबदार होऊन गेलेले लोकप्रतिनिधी.आता जी आरक्षण पडली यात नागरिकांना विचारात घेतलं नाही.-शाम भोसले (रहीवाशी राजारामनगर/आदर्शनगर

किवळे कचरा संकलन डेपोसाठी आयुक्त जिद्दीला पेटले आहेत.शहर अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी पण म्हणतात तिथेच होणार कचरा संकलन ऑडनस फॅक्टरी व नागरिकांचा विरोध आहे. पण अधिकाऱ्यांना त्याचा घेणेदेणे नाही. – धर्मपाल तंतरपाळे-संस्थापक अध्यक्ष फुले आंबेडकर विचार मंच

टॅक्सचा मोबदला आजार पण देऊन करणार का? असा सवाल महानगरपालिका प्रशासनाला आहे. संजय कुलकर्णी टेंडर मध्ये काही मिळणार म्हणून ते कचरा डेपोसाठी आग्रही दिसतात कचरा संकलन डेपो बाजूला करणार नागरिकांच्या हितासाठी पुढे येणार.-निलेश तरस,शिवसेना शहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर

पोलीस बाळाचा वापर करून कचरा संकलनाचा घाट घालून कचरा डेपो महापालिका प्रशासन करत आहे हीच ताकद महापालिकेने विरंगुळा केंद्र मुतारी गार्डन हॉस्पिटल व इतर नागरी सुविधांसाठी दाखवावी आयुक्तांचा निषेध करतो आयुक्तांनी कचरा संकलन ठिकाणी बोर्ड का लावले नाही त्यामुळे नागरिकांची फसवणूक बिल्डर आणि महापालिका आयुक्त यांनी केली आहे दाट लोकवस्तीमध्ये कचरा संकलन का 2017 ते 22 ते पदावर असणारे लोकप्रतिनिधी यांना हे माहित पण नव्हतं म्हणजे त्यांना वार्डातलं काही कळत नव्हतं अशा अनपढ लोकांमुळे केवळ भागाचा विकास झाला नाही माजी नगरसेवक लोकांची दिशाभूल करत आहेत आम्ही पुढे आलो याचा अर्थ आम्ही राजकारण करत आहे अशा लोकांची दिशाभूल करतात पण आम्हाला नागरिकांचे प्रश्न अति महत्त्वाचे वाटतात.– राजेंद्र तरस,मावळ लोकसभा युवासेना अध्यक्ष

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × three =

error: Content is protected !!
Exit mobile version