Home ताज्या बातम्या “आधी स्थलांतर नंतर कारवाई रहिवाश्यांची मागणी” मनपा प्रशासन मागणी पुर्ण करणार का?...

“आधी स्थलांतर नंतर कारवाई रहिवाश्यांची मागणी” मनपा प्रशासन मागणी पुर्ण करणार का? कारवाई थांबवणार का?

0

चिंचवड,दि.२८ फेब्रुवारी २०२५ ( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत गेल्या चाळीस वर्षापासून वेताळनगर,मोरया नगर, झोपडपट्टी रहिवासी आहोत स्थानिक नागरिक झोपडपट्टी रहिवासी व काही घरामध्ये व्यवसाय करित असलेली बिगर निवासी झोपडी आहेत काही पात्र अपात्र असून सदर झोपडीचे सेवा आकार व इतर करांचे बील तसेच नवीन फोटोपास, मनपा मिळकत कर पावती देखील त्याच्याकडे उपलब्ध आहेत.

वेताळनगर झोपडपटटीचे पुर्नवसन योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत त्यांचे पुर्नवसन झालेले नसल्यामुळे तेथील रहिवासी सदर ठिकाणी वास्तव्यास आहेत. निवासी झोपडया व व्यवसाय करित असलेल्या बिगर निवासी झोपड्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडप‌ट्टी पुनर्वसन विभाग यांच्या सव्र्व्हेक्षण नुसार अधिकृत आहेत सदर झोपडयाची बिगर निवासी झोपडयाची अधिकृत नोंद ही झोपडपट्टी पुनर्वसन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या कडे रेकॉर्डला नोंद आहे.

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे कागदपत्रे सादर केले आहे. नवीन फोटोपास, मनपा कर पावती यासह इतर पुरावे देखील सोबतच्या निवेदनात सादर केले आहेत. सर्व गोष्टीचा विचार करून रहिवाशांवर होणारी कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांच्या वतीने आज करण्यात आलेले आहे महापालिका आयुक्त व संबंधित विभागातील अधिकारी कारवाई थांबवतीलका याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.निवेदन सादर करतांना स्थानिक रहिवासी उपस्थित होते दत्तात्रय गायकवाड, शामराव भालेराव, रुक्मिणी भालेराव, दिनेश लोखंडे, शौकतअली नदाफ , शहाजी तांबे, जैतूनबी शेख, लक्ष्मीबाई शेडगे ,हेमांगी अवचिते ,हेमांगी मोरे, नसरीन शेख, निळकंठ बिराजदार ,आशा जाधव, हनीफा शेख ,समीर शेख, यासीन शेख, कासिमबी पटेल ,उबेद शेख, रुबीना खान, शमा खान. यासह रहिवासी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleसर्व शिवभक्तांना महाशिवरात्री निमित्त चहा आणि खिचडी व फराळ वाटप..
Next articleउपमुख्यमंञ्याकडे थेट तक्रार SRA प्रोजेक्ट काळाखडक येथील नागरिकांचे स्थलातंर करु नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + two =