पिंपरी,दि.२३ जानेवारी २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी मा.संजय ठोंबे यांची निवड संस्थापक अध्यक्ष मा.अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने ९ जानेवारी २०२५ रोजी,मा.सुरेश मोहिते सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे हस्ते कार्यकारणीचे पत्र देण्यात आले.वंचित घटक असेल कामगारांवर होणारे अन्याय अत्याचार असतील,ट्रान्सस्पोर्ट च्या समस्या असतील या सर्वावर मात करुन कामगारांना वंचित बहुजन माथाडी च्या माध्यमातुन न्याय मिळवुन देणार.अन्याया विरोधात संजय ठोंबे सतत पुढे असणार,जिथे कुठे अन्याय किंवा कामगारांची पिळवणुक होत असेल तर भिऊ नका फोनचा गजर वाजला की संजय ठोंबे हजर माझा फोनं नंबर- 99224 40293 कधीही कोणतीही समस्या असु द्या फोन करा अशी माहिती बोलताना ठोंबे यांनी दिली.
यावेळी वंचित बहुजन अघाडी माजी शहर उपाध्यक्ष मा.संतोष जोगदंड शहर सचिव मा.राजेंद्र साळवे मा.दत्ता गायकवाड तसेच संपुर्ण कार्यकारणी पदाधिकारी यावेळी उपस्थीतीत होते.