तळेगाव,दि.२३ जानेवारी २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- संग्राम जगताप मित्र परिवार व हरि ओम ग्रुप आयोजित,मावळचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनील (आण्णा) शेळके यांचा भव्य नागरी सत्कार आणि माता भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ सालाबादप्रमाणे शनिवार २५ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० ते ९.३० या वेळेत मकर संक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अहवान कार्यक्रमाचे आयोजक संग्राम जगताप यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणुन सिनेनाट्य अभिनेत्री मा. सौ. ऐश्वर्या नारकर, गुरुवर्य हितेशभाऊ वानखेडे उपस्थिती असणार आहेत. कार्यक्रमात हरिमूरली व चौघडा वादन, तसेच माता भगिनींसाठी आकर्षक बक्षिसांसह राजेश बारणे प्रस्तुत न्यु होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले आहे. संग्राम कृष्णराव जगताप मित्र परिवार आणि नाना भालेराव काॅलनी तळेगाव स्टेशन पंचक्रोशीतील रहिवासी हरी ओम ग्रुपच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.लकी ड्राॅ कुपण आणि फाॅर्म साठी संपर्क, हॉटेल ड्रीम लंच नाना भालेराव कॉलनी तळेगाव दाभाडे स्टेशन याठिकाणी संपर्क साधावा,कुपण २५ जानेवारी २०२५ रोजी सायं.६.००वा स्विकारले जातील.