पिंपरी,दि.२२ ऑक्टोबर २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- योगेश बहल शहराध्यक्ष होताच रागा हॉटेल काळेवाडी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांचे साधला संवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी काही आरोप व खंत व्यक्त केली आहे. आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिका-यांची नाराजी आहे. मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असून बहल यांनी सांगितले,रिपाईच्या चंद्रकांताताई सोनकांबळे,शिवसेना शिंदे गटाचे जितेंद्र ननावरे,भाजपाच्या सीमा सावळे,तेजस्विनी कदम,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गौतम चाबुकस्वार हे सर्व राष्र्टवादीच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक आहेत तशा त्यांनी अजितदादा पवार व माझ्याशी संपर्क साधला आहे.माञ अजित दादांनी मला इथली परस्थिती पाहुन शहरध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे,इथला इलाज करण्यासाठी मला डाॅक्टर नेमले आहे,म्हणजे पेशंट बदलणार का पेशंटचा इलाज करणार हे पुढे सर्वाना समजेलच माञ पेशंटचा इलाज म्हणजे अण्णा पुन्हा हा संदेश न कळत नवनिर्वाचीत शहरध्यक्ष योगेश बहल यांनी दिला आहे.