चिंचवड,दि.२० ऑक्टोबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अखेर शंकर जगताप यांना चिंचवड विधानसभेचे उमेदवारी जाहीर संयमी अभ्यासू व भविष्यातील विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या युवा नेतृत्वाला चिंचवड विधानसभेच्या विकासाची संधी भारतीय जनता पार्टीने दिली याआधी शंकर जगताप यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली शहराध्यक्ष पदाला दा देत असताना त्यांनी अनेक सामाजिक कार्य व त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्व जनमानसात मिसळून फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी विधानसभेच्या विकासासाठी स्वतःला झोकून देत नव दिशा नवा पाऊलवाटा निवडत कुणालाही नाराज न करता सर्वांना एकत्रित घेत निवडणुकीला सामोरे जात आहे मात्र जनतेच्या न्यायालयात शंकर जगताप यांना जगताप कुटुंबियांचा जगताप फॅक्टर प्रमाणे विधानसभेमध्ये जाण्याची संधी निर्माण झाली त्या संधीला साथ देतील का हे येणाऱ्या विधानसभेच्या मतदानातुन आपणास २३ तारखेला मतमोजणीच्या दिवशी कळेल.माञ चर्चा फक्त शंकरशेठ यांची त्यांच्या समोर भाऊसाहेब भोईर,मोरेश्वर भोंडवे व राहुल कलाटे यांचे अहवान असणार आहे.महायुतीची जागा भाजपला गेल्याने शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.