Home ताज्या बातम्या आमदार महेश लांडगे व मित्र परिवाराचे स्नेहभोजन – मांसाहारी व शाकाहारी जेवनाची...

आमदार महेश लांडगे व मित्र परिवाराचे स्नेहभोजन – मांसाहारी व शाकाहारी जेवनाची जय्यत मेजवाणी

124
0

चिखली,दि.२१ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-श्रावण महिन्याची चाहुल लागली असून, आखाडात मटन आणि चिकनसह सामिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची तयारी घरोघरी सुरू असतेच. तांबडा-पांढरा रस्सा… हा तर मांसाहार प्रेमींसाठी पर्वणीच असते. भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-तळवडे या भागात ८ ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’च्या धर्तीवर आयोजित केलेल्या आखाड महोत्सवात सुमारे २० हजार नागरिकांनी सामिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.

भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांनाही ‘आखाड पार्टी’ साजरी करता यावी. आपल्या मित्र परिवारासह कार्यकर्त्यांना वर्षातून एकवेळ सामिष्ट पाहुणचार द्यावा. याकरिता आमदार महेश लांडगे व मित्र परिवार यांच्या वतीने ‘‘आखाड महोत्सव-२०२४’’ चे आयोजन केले आहे. दि. १९ जुलै ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान हा महोत्सव सुरू झाला आहे.‘कम्युनिटी किचन’च्या धर्तीवर भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण ३६ ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २ लाखांपेक्षा जास्त खवय्ये पिंपरी-चिंचवडकर आखाड भोजनाचा आस्वाद घेतील, असा दावा केला जात आहे.

…या ठिकाणी नागरिकांनी घेतला आस्वाद
तळवडे- चिखली भागातील कै. बबनराव मोरे मैदान, मोरेवस्ती चिखली, ओंकार लॉन्स, मोशी-देहु रोड, पाटीलनगर, विरोबा मंदिर मैदान, आदेश पेट्रोलपंपासमोर, यादवनगर, कुदळवाडी, सोमनाथ मेमाणे यांचा प्लॉट, तुकारामनगर तळवडे गावठाण, पांडुरंग भालेकर यांचे गोडाउन, गणेशनगर बसस्टॉपमागे, तळवडे, निलेश भालेकर यांचे जनसंपर्क कार्यालयासमोरील मैदान, त्रिवेणीनगर, प्रबोधनकार ठाकरे शाळेचे मैदान, रुपीनगर-तळवडे तसेच, पांडुरंग साने जनसंपर्क कार्यालय, झेंडा चौक, मोरेवस्ती येथे केवळ महिलांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आखाड महोत्सवास सुरूवातीलाच तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

Previous articleआषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा
Next articleसंत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश मेडीयम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 10 =