Home ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर स्मार्ट आरोग्य केंद्रात करावे- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर स्मार्ट आरोग्य केंद्रात करावे- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

78
0
ठाणे,दि.१३ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्मार्ट आरोग्य केंद्रात रूपांतर करावे. तसेच या केंद्रांच्या अत्याधुनिकरणानंतर त्या ठिकाणी अनुभवी कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करावी जेणेकरून रुग्णांना मोठा आरोग्य दिलासा मिळेल. अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.
तसेच जिल्ह्यातील गरजू रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी सर्व सरकारी रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली बंधनकारक करावी, अशी मागणी देखील यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी केली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी विविध विषय मांडले. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी जिल्ह्याच्या आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यात यावी असे सूचित केले. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर स्मार्ट आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा आरोग्य केंद्रात करण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे या मॉडेल स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर करून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा आणि उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खासदार डॉ.शिंदे यांनी केली. तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच आरोग्य आणि शिक्षण असा दरवर्षी एक विषय घेऊन त्याबाबत सविस्तर आराखडा तयार करून या सेवा सुधारित करण्यासाठी नियोजनबध्द पद्धतीने काम करावे. असा महत्वाचा मुद्दा यावेळी उपस्थित केला. याबाबत एक आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी याावेली स्पष्ट केले.
तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालय चालविण्यासाठी लागणारी यंत्रणा अर्थातच मनुष्यबळ हे प्रशिक्षित आणि अनुभवी असावे, असेही यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी नमूद केले. याबाबत तातडीने सविस्तर आराखडा सादर करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे सुसूत्रीकरण करणारी एक नियोजित यंत्रणा नसल्याने रुग्णांना ऐनवेळी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी सर्व रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली बंधनकारक करावी. तसेच रुग्णवाहिकांची आणि त्याच्या चालकांची सविस्तर माहिती असलेला एक डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. त्या व्यवस्थेचे नियंत्रण जिल्हास्तरावर आणि स्थानिक प्रशासनाने ठेवावे. यामुळे रुग्णांना तातडीने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. असे यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले.
सरकारच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा यांसारख्या अनेक योजना सरकार राबवित आहेत. मात्र या योजनांचा लाभ किती जणांना आपण देणार आहोत.याबाबत सविस्तर माहिती घेणे महत्त्वाचे आहे. लाभार्थ्यांचे लक्ष्य ठरविले असल्यासच सर्व योजनांचा लाभ नागरिकांना देता येईल.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रुपये देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातील एमआयडीसी, खासगी कंपन्या यांच्या माध्यमातून आपण किती रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. याबाबत माहिती घ्यावी आणि त्यानुसार ही योजना तातडीने राबवावी अशा सूचना यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी केल्या. तसेच शासनाच्या मोठी लाभार्थी संख्या असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची योजना निहाय टीम बनवावी आणि त्यानुसार काम करावे. असेही खासदार डॉ.शिंदे यांनी सूचित केले.

 

Previous articleरावेत येथील पीसीसीओईआर च्या एनएसएस विभागाचे वृक्षारोपण
Next articleवाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची काश्मीर सहल निर्विघ्न संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five − two =