वाकड,दि.१३ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पोस्टल कॉलनी वाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची सहल शनिवार दि २२जून ते २९ जून या दरम्यान मुख्य विमान प्रवासासह भाग्यश्री ट्रॅव्हलद्वारे निर्विघ्न पडली. सर्वप्रथम माता कटरास्थित बाबा भैरवनाथासह वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन उतुंग बर्फाच्छादित हिमशिखरांना डोळ्यात सामावून घेत पहेलगामला पोहोचली.गंधर्व नगरी,गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगर व्यापलेला साऱ्या परिसरातील बेताब व्हॅली,आर्श व्हॅली, ग्लेशियर पॉईंट , मनमोहक निसर्ग, हाऊस बोट, शिकारा, निशांत गार्डन,मुघल गार्डन भारताचा स्वर्ग म्हणून गणले जाणारे काश्मीर पाहून शेवटी डोळ्यांचे पारणे फेडणारे,स्वतःचे वैशिष्ट्य जपलेले पंजाबातील सुवर्ण मंदिर पाहून सहलीची सांगता झाली. सारे जेष्ठ स्वर्गीय अविस्मरणीय आनंदाचा आस्वाद घेऊन सुखरूप परतले. उत्तम नियोजन करून सहल निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी झटणारे अध्यक्ष भागवत कोल्हे,श्री बोरकर, श्री रेवणवार,श्री तेली,श्री लहाने, श्री गिरमे,श्री बऱ्हाटे आणि सर्व सहल समिती सदस्य तसेच प्रसिद्धी प्रमुख श्री बोंडे यांच्या सहकार्याने पार पडली.