Home ताज्या बातम्या संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद,आमचं ठरलंय; मावळ लोकसभेसाठी शहरी भागात मतदारांचा...

संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद,आमचं ठरलंय; मावळ लोकसभेसाठी शहरी भागात मतदारांचा वाढता पाठिंबा

24
0

पिंपळेनिलख,दि.०१ एप्रिल २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पिंपळे निलख गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमचं ठरलंय, असं म्हणत मावळ लोकसभेसाठी शहरी भागात मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

ठिकठिकाणी माता-भगिनींकडून संजोग वाघेरे पाटलांचे औक्षण करून स्वागत केले जात होते. “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणांनी अक्षरशः परिसर दणाणून गेला होता. वाघेरे पाटील यांनी चालत चालत नागरिकांच्या गाठी-भेटी घेत होते. मतदारांकडून शुभेच्छांचा स्वीकार करीत संजोग वाघेरे पाटील मनापासून विचारपूस करत होते. कडाक्याच्या उनाळा असूनही कार्यकर्त्यांच्या उत्साहात भरच पडत होती. वाघेरे पाटील यांना मावळ लोकसभेत पाठवण्याचा निर्धार येथील नागरिकांकडून केला जात आहे.

पिंपळे निलख येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, संतोष साठे, शिरीष साठे, पवन कामठे, नितीन इंगवले, प्रकाश बालवडकर, सचिन साठे, पृथ्वीराज साठे, भूषण इंगवले तसेच विशाल नगर येथील दिलीप बालवडकर, नंदू बालवडकर, आरती चौंधे, पवन कामठे, काळूराम नांडगुदे, पांडुरंग थोपटे, संकेत चौंधें, रवी साठे, अनिल संचेती, भुलेश्वर नांदगुडे, गणेश काटे, संदीप कामठे, महेश इंगवले, संकेत जगताप, मिरा कदम, संदीप कामठे, प्रदीप जगताप, शोभा नानी जगताप, माणिक भांडे, दौलत कामठे, संजय साठे, भाऊसाहेब बडगे, दिनेश टकले, सागर साठे, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक ,सभा, प्रचार दौ-यांच्या नियोजनावर चर्चा
Next articleशिवरायांच्या महाराष्ट्र ! इथे गद्दारांना थारा नाही,धडा शिकवला जाईल !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 9 =