Home ताज्या बातम्या BreakingNews Loksabha election 2024:: लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजल;महाराष्ट्रात 5 टप्यात होणार मतदान

BreakingNews Loksabha election 2024:: लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजल;महाराष्ट्रात 5 टप्यात होणार मतदान

167
0

मावळ,दि.१६ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजल,लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेत निवडणुकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे.
देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ देखील संपत आहे. तिथेही निवडणुका होणार आहेत असे पञकार परिषदेत जाहीर केले.

१०.५ लाख पोलिंग बूथ असून ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत,
देशातील भौगोलिक परिस्थिती पहाता वेगवेगळ्या टप्यात निवडणुका पार पडणार आहेत या आधीही वेगवेगळ्या टप्यात निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होईल, असून दीड कोटी निवडणूक अधिकारी असतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हटले, मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत.यापुर्वी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आल्याने सगळ्या हिंसा आणि पैशांचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाहीत.

‘मिथ वर्सेस रियालिटी’ अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचे निवडणुक अधिकारी यांनी सांगितले. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे,त्यामुळे निवडणुक पारदर्शी पार पडेल असे मत मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान

पहिला टप्पा : मतदान- १९ एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील ५)

दुसरा टप्पा : मतदान- २६ एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – ८)

तिसरा टप्पा : मतदान- ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – ११)

चौथा टप्पा : १३ मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – ११)

पाचवा टप्पा : २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – १३ )

५४३ लोकसभा मतदारसंघ
 टप्यात निवडणुका होणार

पहिला टप्पा- १९ एप्रिल ला मतदान होईल

दुसरा टप्पा – २६ एप्रिल २०२४ ला मतदान होणार

तिसरा टप्पा – ७ मे ला मतदान होणार

चौथा टप्पा – १३ मे ला मतदान

पाचवा टप्पा – २० मे ला मतदान होईल

सहावा टप्पा – २५ मे ला मतदान होणार

सातवा टप्पा – १ जून ला मतदान होणार

महाराष्ट्रात ५ टप्यात मतदान होणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार आहेत

४८ हजार तृतीयपंथी मतदार

१०० वर्षांवरील मतदार २ लाख

४९.७ कोटी पुरुष मतदार

४७.१ कोटी महिला मतदार

१८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार

८२ लाख प्रौढ मतदार

महिला मतदारांची संख्या १२ राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.

Previous articleशनिवारी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार
Next articleशिवतारेनी माफी मागितली तर आम्ही काम करु अन्यथा..-अजित गव्हाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 12 =