Home ताज्या बातम्या सदाशिव खाडे यांची अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या नियामक मंडळावर नियुक्ती

सदाशिव खाडे यांची अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या नियामक मंडळावर नियुक्ती

161
0

पिंपरी,दि. ४ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भाजपाचे ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे यांची पुणे, लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ नियामक मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव अजित काटकर यांनी ३ जानेवारी रोजी तसे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव आणि सदाशिव खाडे यांना दिले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठाच्या नियामक मंडळावर राज्य शासनाने नामनिर्देशित सदस्य म्हणून सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली आहे.
सदाशिव खाडे हे पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. खाडे यांनी यापूर्वी राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात १४ हजार घरांचे नियोजन करून ६हजार घरांचे वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र केंद्राचे काम, प्रशस्त रस्ते, मोठी उद्याने असे प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात विकसित झाले आहेत. तसेच प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ, पिंपरी चिंचवड वृक्ष प्राधिकरण समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ समिती वर त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे ते संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य पदी कार्यरत आहेत. राजकारण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. यामध्ये गजलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, ब्रह्मचैतन्य फाउंडेशन, साकोसा मित्र मंडळ तसेच भटके,विमुक्त परिषदेत देखील ते काम पाहत आहेत. खाडे यांच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवड भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Previous articleसांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे-उद्योगमंत्री उदय सामंत
Next article१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, पिंपरी – चिंचवड पाहू नाट्य संमेलन विसरु नका कोणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 − 1 =