पिंपरी,दि.२५ ऑक्टोबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सह. शहर अभियंता श्रीकांत श्रीनिवास सवणे यांना तीन अपत्य असून त्यांची नावे १) संकेत श्रीकांत सवणे मुलगा जन्म दि.३०/०८/१९९७, २) सायली श्रीकांत सवणे मुलगी जन्म दि.०२/०६/१९९९ आणि ३) अथर्व श्रीकांत सवणे मुलगा जन्म दि.०१/१२/२००५ हे तिन्ही अपत्य त्यांना पत्नी वैशाली श्रीकांत सवणे यांच्या पासून जन्मले आहेत.
श्री. श्रीकांत श्रीनिवास सवणे यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र शासन निर्णय २८/मार्च/२००५ लहान कुटुंब यामध्ये शासनाने नमूद केलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ईटकर यांनी केली आहे.
आयुक्त साहेब श्रीकांत श्रीनिवास सवणे याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका फसवणूक करून पदोन्नोतीचा लाभ घेतला त्यामुळे ते कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. त्यांना सेवाविषयक कोणत्याही लाभ देणेत येवू नये. तसेच त्यांच्या सेवापुस्तीकेची, धन्वतंरी विभागाकडे आपल्या बाबत नोंदीची सखोल चौकशी करून त्यांनी महाराष्ट्र शासनाची व महानगरपालिका याची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर फौजदारी दाखल करून योग्यती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे ज्ञानेश्वर ईटकर यांनी पत्रात नमूद केले आहे.