Home ताज्या बातम्या चंद्रभागा कॉर्नरला नवरात्र उत्सव ठरत आहे नागरिकांचे आकर्षण,दिपक भोंडवे च्या माध्यमातुन उत्कृष्ट...

चंद्रभागा कॉर्नरला नवरात्र उत्सव ठरत आहे नागरिकांचे आकर्षण,दिपक भोंडवे च्या माध्यमातुन उत्कृष्ट उपक्रम

177
0

रावेत,दि.२१ ऑक्टोबर २०२३(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- श्री. दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन आयोजित भव्य नवरात्र उत्सव नागरीकांचे आकर्षण ठरत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अश्विनीताई लक्ष्मण भाऊ जगताप यांनी भेट दिली. आमदार ताईंच्या हस्ते “चंद्रभागा कॉर्नर जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे” उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.संपुर्ण रावेत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते देवीची आरती पार पाडली जाते.मा.शंकरशेठ जगताप, शहराध्यक्ष पिं.चिं. भाजपा यांनी कार्यक्रमाला भेट देऊन केले. फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचे कौतुक केले. मा.शहराध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री.दिपक भोंडवे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आयोजन व विविध कामाचे आणि आयोजन केलेल्या नवराञ उत्सवाचे व कार्याचे कौतुक केले.


नवराञ उत्सवाला परिसरातील ज्येष्ठांपासुन ते लहान मुलांन पर्यंत मोठी गर्दी होत आहे.विशेषताः महिलांचा उत्स्फूर्त असा मोठा सहभाग असल्याने मोठ्या प्रमाणात दांडिया गरबा च्या आकर्षण पाहायला मिळत आहे. सोमनाथ भोंडवे, बाळासाहेब ओव्हाळ, अमोल भोंडवे, संतोष (आप्पा) भोंडवे, फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप काळोखे, सुनील भोंडवे संतोष भोंडवे, अजय भोंडवे आदी कार्यक्रमाला उपस्थित असतात.विविध नेते मंडळी ह्या नवरात्र उत्सवात स्वतःहून सहभागी होत आहेत रोज विविध उपक्रम श्री दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन च्या वतीने घेतले जात आहे. त्यामुळे सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. वेळेचे बंधन असल्याने कार्यक्रम लवकर होत आहेत. मात्र चंद्रभागा कॉर्नर श्री दिपक मधुकर भोंडवे यांनी भरवलेल्या नवरात्र उत्सवात गर्दी कमी व्हायच्या नाव काय मात्र घेत नाही. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात चंद्रभागा कॉर्नर च्या दांड्याची चर्चा होत, असून संपूर्ण रावेत,किवळ, विकास नगर,मामुर्डी या भागात श्री दिपक मधुकर भोंडवे आयोजित चंद्रभागाकडून नवरात्र उत्सव आकर्षण ठरत आहे. एवढी गर्दी बघून अनेकांच्या भुया उंचावल्या असल्या तरी दिपक भोंडवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कोणतेही काम असो  निस्वार्थीपणाने केले की त्याचे फळ नक्कीच चांगले मिळते, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपण जर समाजाचे हित पाहिलं तर कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. त्यामुळे या नवरात्र उत्सवात माताच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना सुख-समृद्धी भरभराटीचे जीवण लाभू दे.अशी प्रर्थना केली.असाच नागरीकांचा सहभाग वाढत आहे.दिपक भोंडवे यांची लोक प्रियता यातुन दिसुन येत आहे.

Previous articleजय महाराष्र्ट करत प्रदेश प्रवक्ता आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ पवारांनी दिला राजीनामा
Next articleमा नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आयोजीत रावेत येथे दांडियाचा उत्साह जोरात….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × five =