Home ताज्या बातम्या ‘विरोधी पक्षाच्या अस्तित्वाचा’ सत्तापक्षाकडुन सन्मान.. हा लोकशाहीचा गाभा..- काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा...

‘विरोधी पक्षाच्या अस्तित्वाचा’ सत्तापक्षाकडुन सन्मान.. हा लोकशाहीचा गाभा..- काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी.

136
0

पिंपरी,दि ७ आक्टोंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – जनता फक्त विकासाच्या नावाखाली प्रतिनिधी निवडत नाही तर ‘विश्वासार्हता व ऊत्तरदायीत्वाची’ देखील राजकीय नेते व पक्षाकडुन अपेक्षा ठेवते. केवळ ४- ५ महीने ‘विकासासाठी सत्तेत गेलो’ म्हणणे हास्यास्पदच असल्याची टीका पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यावर काँग्रेस राज्य प्रवक्ते व पिंपरी चिंचवड चे निरिक्षक गोपाळदादा तिवारी यांनी केली.पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते, पिपरी चिचवड काँग्रेस कमिटीचा कार्य-आढावा घेण्यासाठी ते आले होते.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी, भ्रष्टाचारी म्हणून हिणवणाऱ्या भाजपशी हातमिळवणी करून व धर्मनिरपेक्ष राजकीय तत्वास हरताळ फासला व स्वतःच्या राजकीय विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण केला आहे.‘विरोधी पक्षाच्या अस्तित्वाची’ सत्तापक्षाकडुन जपणुक व सन्मान हा लोकशाहीचा गाभा आहे. मात्र ‘मदर ॲाफ डेमॅाक्रॅासी’ म्हणवणाऱ्या भाजप कडुन वारंवार मदर ॲाफ डेमॅाक्रॅासीचा गर्भपात केला जात आहे..!
भाजप विरोधात मतदान केलेल्या भ्रष्टाचारी (?) राष्ट्रवादी नेत्यांना सत्तेत सामावून घेऊन, त्यांचे कृत्यांवर पांधरूण घालणाऱ्या भाजपला लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी प्रखर टिका देखील गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी बोलतांना केली.“पिंपरी चिचवड शहराच्या पायाभूत विकासाची मुहूर्तमेढ” ही खरेतर स्व आण्णासाहेब मगर, स्व रामकृष्ण मोरे, मा शरदरावजी पवार या काँग्रेस प्रणीत नेत्यांच्या राजवटीतच झाली असुन, येत्या काळात पिंपरी चिंचवड मध्ये काँग्रेस आघाडीची एक हाती सत्ता येईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला!

या प्रसंगी महीला काँग्रेस नेत्या श्रीमती शामलाताई सोनावणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, विश्वनाथ जगताप, अभिमन्यु दहितूले, बन्सी शिंदे, वीरेंद्र गायकवाड, विठ्ठल शिंदे, विजय ओव्हाळ, विशाल सरवदे, डॅा.मनीषा गरुड, गौरी शेलार, अर्चना राऊत, उमेश बनसोडे, अमरजितसिंग पोठीवाल, भाऊसाहेब मुगुटमल,तारिक रिझवी, बाबा बनसोडे, जुबेर खान, मेहबूब शेख, गौतम ओव्हाळ, मिलिंद फडतरे, इरफान शेख, सतीश भोसले, पांडुरंग जगताप, उपस्थित होते.प्रास्ताविक विश्वनाथ जगताप यांनी तर आभार प्रदर्शन विजय ओव्हाळ यांनी केले ..!

 

Previous articleलोकसभा निवडणुक २०२४ मध्ये नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार का ?
Next article१४ ऑक्टोबर २०२३ ला पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होतोय धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − sixteen =