Home ताज्या बातम्या विकासनगर किवळे भागात घुमला ढोल ताशाचा अवाज तर राजेंद्र तरस सोशल फाऊण्डेशन...

विकासनगर किवळे भागात घुमला ढोल ताशाचा अवाज तर राजेंद्र तरस सोशल फाऊण्डेशन कडुन स्वागत

165
0

विकासनगर-किवळे,दि.३० सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-विकास नगर मध्ये घुमला ढोल ताशांचा आवाज राजेंद्र सोशल फाउंडेशन च्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाचा विसर्जन करण्यात आले, आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून ढोल ताशा डीजेचा निनादात मंडळाकडून मिरवणुका काढण्यात आल्या, सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन मंडळाच्या सहकार्यामुळे व्यवस्थित पार पडले.

यंदाच्या वर्षी विकास नगर किवळे भागात सर्व मंडळाच्या सहकार्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुका अतिशय उत्साहात पार पडल्या, पोलिसांचा उत्कृष्ट असा बंदोबस्त होता पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच पोलीस मित्र व विद्यार्थी ही उपस्थित होते. सर्व मंडळांचे शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्तम सहकार्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

महापालिकेच्या निवडणुका कधी होतील हे निश्चित नसताना सुद्धा अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी स्वागताच्या फलक लावले, घरगुती गणपतीच्या अनेकांना नदीत विसर्जन न करता कृत्रिम हौद बनवून त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने विसर्जन घाटावरही स्वागत कमान उभारण्यात आली होती.

अनेक राजकीय पक्षांनी अनेक गणेश मंडळाच्या मागे उभे राहत यंदाच्या गणेशोत्सव आनंदात उत्साह पार पाडला. तर ऐश्वर्या राजेंद्र तरस व राजेंद्र तरस यांनी सर्व गणेश मंडळांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी बाळासाहेब तरस,धर्मपाल तंत्रपाळे, सिंधू तंत्रपाळे, रवींद्र कदम, विकास कडलक, संतोष मस्के,सिद्धार्थ चव्हाण,दिलीप दांगट, देवेंद्र तरस,अविनाश गायकवाड,प्रशांत तावरे,गणेश गावडे,भारत शिवणकर,शशीकांत तावडे,सुधीर तरस,सुनिता चंदणे,महामोहणी पाल,इलियाज खान,ज्ञानेश्वर कुदळे,देवराम भेगडे,संदीप भेगडे,विकासनगर रिक्षा संघटनाचे सर्व रिक्षा चालक मालक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleSRA प्रकल्पाचे आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न
Next articleशिल्पांच्या माध्यमातून ग्रामसंस्कृती, पारंपरिक खेळांची जनजागृती- भाजपा आमदार महेश लांडगे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × one =