Home ताज्या बातम्या SRA प्रकल्पाचे आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न

SRA प्रकल्पाचे आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न

232
0

रावेत,दि.२९ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड व आर.के. डेव्हलपर्स यांच्या माध्यमातुन SRA रमाबाई नगर रावेत च्या झोपडपट्टी धारक,गोरगरीबांच्या वास्तुचा भुमीपुजन सोहळा पार पडला.

मा.नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या पुढाकारांने घरांचा प्रश्न मार्गी लागला.श्रीमती. आश्विनीताई जगताप (आमदार चिंचवड विधानसभा) यांच्या हस्ते हा भुमीपुजन सोहळा पार पडला.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या लक्ष्मण भाऊ जगताप यांचा प्रकल्प बाळासाहेब ओव्हाळ यांनी तो तडीस नेला,लक्ष्मण भाऊ नाहीत म्हणुन बाळासाहेब गप्प बसले नाहीत तो प्रकल्प पुर्ण केला.बाळासाहेबान वर विश्वास ठेवा बाकी कुणावर विश्वास ठेऊ नका.सर्वांना यात घरे भेटणार आहेत. तसेच या प्रभागात जवळच सरकारी दवाखाना महिला प्रस्तुती साठी निर्माण करुन इथला हा प्रश्न लवकरच मार्गी लावेन असे अश्वासन दिले.

बाळासाहेब ओव्हाळ यांना प्रास्ताविक भाषणात बोलताना इथल्या अडचणी सांगितल्या संपुर्ण अडचणी सोडवल्या आहेत.माञ इथल्या दुसर्‍या पक्षाचे नगरसेवकांन वर कारवाईची मागणी देखील केली.मनातील खंत भर स्टेजवर नागरीक पोलीस आमदार यांच्या समोर बोलुन दाखवली.गोरगरीब कष्टकर्‍यांचा मी नगरसेवक आहे.आठवले साहेब माझे मर्गदर्शक तर लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मला राजकीय काराकीर्दीत संभाळले आहे.त्यांच्या पन्ती आमदार अश्विनी ताई जगताप यांच्या हस्ते भुमीपुजन झाले आणि भाऊनां दिलेला शब्द पुर्ण केला याचा आनंद झाल्याचे म्हटले,अनेक नागरीकांना संभ्रमित केले जात आहे त्यांनी कृपया कोणावर विश्वास ठेवू नका कोणाचही घरी आतून सुटणार नाही प्रत्येकाला यायचे घर भेटणार ज्यांची नावे आहेत त्यांनाही आणि त्यांची नावे नाहीत त्यांनाही असे बोलून त्यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला.यावेळी रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे, आर के डेव्हलपर्सचे बिल्डर राजेश कदम, युवा नेते दिपक भोंडवे, उद्योजक सोमनाथ भोंडवे, रिपब्लिकन पक्ष(आठवले) महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत,शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष निलेश तरस,माजी नगरसेवक बिबीशन चौधरी,माजी नगरसेवक नामदेव ढाके,महिला नेत्या निशा बाळासाहेब ओव्हाळ,उद्योजक गौतम गायकवाड, पोलीस दक्षता समितीचे धीरज ठाकूर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, रिपब्लिकन एम्प्लॉईस फेडरेशनचे विनोद चांदमारे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय जनता पक्षाचे चे कार्यकर्ते पदाधिकारी रमाबाई नगर चे रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी
Next articleविकासनगर किवळे भागात घुमला ढोल ताशाचा अवाज तर राजेंद्र तरस सोशल फाऊण्डेशन कडुन स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 5 =