किवळे,दि.१५ ऑगस्ट २०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- किवळे-देहूरोड येथील एस् आय एस् सेठ एच् ए बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मिडीयम हायस्कूल ( साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित ) विकासनगर, किवळे या शाळेत 77 वा. स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्षोल्हासात व देशभक्तीपर वातावरणात पार पडला.
शाळेचे सचिव मुरलीधर नायडू यांनी ध्वजारोहण केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलनाचे सादरीकरण केले. तसेच विविध देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच देशभक्ती गीतांवर विविध नृत्यप्रकार व कवायती सादर केल्या. देशभक्ती वर आधारित भाषण व नाटक विद्यार्थ्यानी सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा धारण करून त्यांची वचने सादर केली.
या कार्यक्रमाच्यावेळी साऊथ इंडियन असोसिएशनचे पेट्रान तुकाराम भोंडवे, साऊथ इंडियन असोसिएशनचे व शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, खजिनदार जेकब नाडार, शाळेचे सचिव मुरलीधर नायडू, शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप, संस्थेचे सदस्य व विश्वस्त ए. के. प्रेमचंद्रन, पी हेमंतकुमार, व्यंकटेश ओलारी,एन्थोनी स्वामी, एस् डेव्हीड नाडार, जोगिंदर भाटिया, व आजीवन सदस्य पी तंगराज नाडार, सेल्वन नाडार,अनिलकुमार पनिककर, एस शशीधरण आणि समाजसेविका शुभांगीताई वानखेडे व शाळेच्या उपमुख्याध्यापिका शर्मिला गायकवाड आणि माजी नगरसेविका कु.प्रज्ञाताई खानोलकर, संगीता भोंडवे व समाजसेवक सुदाम तरस, राजेंद्र तरस, निलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, राजू नेटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.