Home ताज्या बातम्या विकासनगर भागात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त महिला रोजगार व मार्गदर्शन मेळावा...

विकासनगर भागात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त महिला रोजगार व मार्गदर्शन मेळावा संपन्न

106
0

किवळे,दि.२६ जुन २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- लोकराजा राजश्री छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त विकासनगर किवळे येथे रमाई महिला बचत गटाच्या वतीने महिला रोजगार व मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला,छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस मा,नगरसेवक बाळासाहेब तरस यांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करण्यात आली, राजेंद्र तरस यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन महिला मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी बाळासाहेब तरस यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले छत्रपती शाहु महाराज यांनी बहुजन समाजाच्या उध्दाराचे काम केले,गरीबांना आरक्षण देऊन एक नवा इतिहास घडवला आज भारत देशात ओबीसी समाजाची सर्वात मोठी संख्या व ताकद असुन ओबीसींना परिपूर्ण आरक्षण मिळु शकत नाही ,शाहुमहाराजांची जंयती मोठ्या प्रमाणात साजरी होत नाही,ही खंत त्यांनी व्यक्त केली, महानगरपालिका पिपरी चिंचवड समुदाय संघटक सौ,अंजलीताई वायकुळे यांनी महिलांना विविध योजनाची माहीती तसेच,रोजगार कसा निर्माण होईल याची माहीती दिली ,या कार्यक्रमाचे आयोजन भावी नगरसेविका सिंधुताई तंतरपाळे यांनी केले,या यावेळी कार्यक्रमास सुनिता ताई चांदणे,मंगल माने, मिनाक्षी वाघमारे,सुमीत्रा अष्टगे,सुनिता मनोहरे,कविता ढोके,रुपाली वानखडे,सारीका सोनवणे,शालु खंडारे,रजनी अयदळे,सुमन कडलक,जोत्सना डवले,अरुणा ढवळे,दिपाली गाडे, शिवसेना (शिंदे गट) संघटक राजेंद्र भावी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे,सुधीर तरस,उद्योजक शाम सिंधवाणी,आर,पी,आय नेते दिलीप कडलक,दिलीप रोकडे,उत्तम हिंगे,लक्ष्मण कांबळे,शुध्दोधन वानखडे,चंद्रकांत तरस,राजु तरस,अजय बखारिया,राजु पवार इत्यादी पदाधिकारी मान्यवर व बहुसंख्य महिला उपस्थित होते.

Previous articleBreaking News:: विस्डम स्कुल मधील पुष्पा ? विनापरवाना केली झाडांची कत्तल
Next articleमाजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उघड,आरोपींना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + 4 =