Home ताज्या बातम्या Breaking News:: विस्डम स्कुल मधील पुष्पा ? विनापरवाना केली झाडांची कत्तल

Breaking News:: विस्डम स्कुल मधील पुष्पा ? विनापरवाना केली झाडांची कत्तल

264
0

किवळे,दि.२४ जुन २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेश मुलांच्या मनावर बिंबला जावा म्हणून शालेय स्तरापासूनच प्रयत्न सुरू होतात. शाळेत फेर वृक्षारोपणाचे कार्यक्रम आखले जातात. पण या सर्वाला विकास नगर किवळे येथील विस्डम शाळा अपवाद ठरली आहे.

विकास नगर किवळे येथील विस्डम शाळा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या इमारती लगतच्या मोकळ्या जागेतील चार झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे.श्री महावीर बरलोटा यांच्या नावे मिळकत असणाऱ्या मालकी हक्काच्या जागेवरील चार झाडांची जमिनीपासून ०६ ते ०७ फूट उंच ठेवून कत्तल करण्यात आली आहे. हि वृक्षतोड बेकायदेशीर व विनापरवाना करण्यात आल्याने श्री महावीर बरलोटा यांनी विस्डम स्कूलचे चेअरमन जयशंकर जयसिंग नडार यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वृक्ष संवर्धन उद्यान विभागाचे उद्यान साहय्यक गजरमल पी.बी यांनी पंचनामा केला आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.श्री महावीर बरलोटा व विनय बरलोटा यांच्या पाठपुराव्याने पंचनामा झाला,असून पुढील कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करून अशा विनापरवाना कायद्याचे उल्लंघन करून वृक्षतोड करणाऱ्यांना कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी केली आहे.

विनापरवानगी झाड तोडणे कायद्याने गुन्हा आहे. झाडावर स्वतःची मालकी असो किंवा दुसऱ्याची मालकी असो शासनाच्या परवानगीशिवाय झाड तोडता येत नाही. महाराष्ट्र झाड तोडण्याबाबत अधिनियम अ‍ॅक्ट नुसार कारवाई झाली पाहिजे यावर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन काय कारवाई करतील याकडे सर्व विकास नगर किवळे,देहूरोड करांचे लक्ष लागून आहे. अशा बेकायदेशीर वृक्ष तोडणाऱ्या पुष्पांना जरब बसणे व कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे.स्कुलची संस्था व चेअरमन मनमानी कारभार करत असुन शाळेची इमारत देखील अनधिकृत असल्याची संपुर्ण परिसरात चर्चा आहे.

Previous articleपत्रकार प्रा. रणजित इंगळे हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा-दिलीप देहाडे
Next articleविकासनगर भागात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त महिला रोजगार व मार्गदर्शन मेळावा संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven − 2 =