पुणे-कसबा,दि.०२ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अखेर कसबा मतदारसंघांमध्ये रवींद्र धंगेकर विजयी कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास ती मते उपयोगी ठरली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने बाजी मारत विजय मिळवल्याने चर्चांना उधाण आलं. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं म्हटले जात आहे.कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ५०.०६ टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, ०२ लाख ७५ हजार ६७९ मतदारांपैकी ०१ लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदान केलं होतं. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडी कडुन एकमताने उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर मोठे आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे भाजपचे धाबे आधिच दणाणले होते. मतमोजणी होण्याआधीच राजकीय वर्तुळात भाजपच्या हातून निसटला पारंपारिक मतदारसंघ काँग्रेस मारणार बाजी अशी जोरदार चर्चा रंगल्या आहेत.रवींद्र धंगेकर मागील २५ वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागांमध्ये रवींद्र धंगेकरांची चांगली पकड होती. सामान्य जनतेचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळणार हे प्रजेचा विकास ने सुरुवातीपासूनच म्हटले होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या धंगेकरांच्या पुढे रासनेंना एकदाही आघाडी मिळाली नाही. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी कसब्यात ऐतिहासिक विजय मिळवत भाजपचा पारंपारिक मतदारसंघ हिसकावल्याने महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे.चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली.केंद्रीय मंञी रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला मैदानात होते. हेमंत रासनेंना पोटनिवडणुकीत जनतेने स्विकारल नाही,जनतेचा कौल काॅंग्रेसला मिळाला.कसब्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शोनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे धंगेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनंही सर्व ताकद लावली होती. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंचा रोड शोदेखील झाला होता. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता.त्याच बरोबर अनेक ठिकाणी भाजपा विरोधात वेगवेगळ्या भुमिका घेतल्या व आर.एस.एस ची मते मिळवण्यात आणि फोडण्यात घंगेकरांना यश मिळाले.
Home ताज्या बातम्या कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर...