चिंचवड,दि.१९ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माझ्यामागे ना कुठला पक्ष ना नेता पाठीशी उभी चिंचवड विधानसभेची जनता होय राहुल कलाटे हेच बोलता येत २०१९ पासून २०१९ च्या चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस(आय), तसेच वंचित बहुजन आघाडी आणि अनेक संघटना मित्रपक्ष यांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र राहुल कलाटे माझ्यामागे ना कुठला पक्ष ना नेता पाठीशी उभी चिंचवड विधानसभेची जनता हाच उद्गार काढत आहेत.२०१९ ला ज्या पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला त्या पक्ष संघटनांचा मतदानामध्ये सहभाग आहे की नाही?,त्या पक्ष संघटनांना मानणाऱ्या मतदारांनी मतदान केले असेल का नसेल ?, मतदारांचा सोडा ज्या मित्रपक्ष संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यांची ही मन जिंकता आली नाही राहुल कलाटे यांना मात्र राहुल कलाटे आज जो डंका आणि अहंकार दाखवत आहेत त्याचा फटका नक्कीच त्यांना या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत बसणार आहे. ज्या ४० संघटनांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना पाठिंबा दिला आहे त्या संघटना २०१९ ला राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभ्या होत्या. आज ज्या पक्षाने उमेदवार दिले आहेत त्याही पक्षाचे पाठिंबा राहुल कलाटे यांना होता. वंचित बहुजन आघाडीने मागच्या २०१९ च्या निवडणुकीत तसेच आता चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे.मात्र २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचितचे जे पदाधिकारी सभासद राहुल कलाटे यांच्यासोबत होते, ते त्यांच्यासोबत आता राहिले नाहीत कारण मागील चार वर्षात वंचितच्या त्या पदाधिकाऱ्यांसोबत कोणताही सहसंबंध नाही कोणत्याही पदाधिकाऱ्यासोबत कोणतेही वंचितच्या कार्यक्रमास उपस्थिती नाही. किंवा वंचितचा कोणताही कार्यक्रमांमध्ये सहभाग नाही, म्हणजेच राहुल कलाटे याना वंचीतचा पाठिंबा चालतो पण वंचितच टिकीट चालत नाही? जर राहुल कलाटे यांना २०१९ ला तिकीट डावल गेल. हे त्यांना माहीत होतं, २०२३ च्या पोट निवडणुकीतही तिकीट डावलले.राहुल कलाटे इतर पक्ष जसे करात तसेच तर करत आहेत. महाविकास आघाडीने नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केले त्यानंतर काही तास काही वेळ राहुल कलाट यांच्याकडे होता, राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश का केला नाही? वंचित बहुजन आघाडीचे तिकीट का मिळवलं नाही?तिकीट घेण्यासाठी संकोच मात्र पाठिंबा हवा, वंचितच काही नेते पुढारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हटले की वंचितच टिकीट घेतला असता तर राहुल कलाटे निवडून येणार नाहीत मात्र पाठिंबा दिला तर निवडून येतील असे संकोचित वृत्तीचे काही पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीमध्ये असल्याने मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे. म्हणजेच वंचितच टिकीट घेतल्याने उमेदवार निवडून येऊ शकत नाही मात्र वंचितच्या पाठिंबा दिल्याने उमेदवार निवडून येऊ शकतो हे लॉजिक मतदारांना पटण्यासारखे नाही यामागे कोणती निगेटिव्ह चुकीची शक्ती तर नाही ना, चिंचवड विधानसभेची जनता सुज्ञ आहे. नक्कीच येणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून चिंचवड विधानसभेची जनता राहुल कलाटे यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.अनेक आश्वासन राहुल कलाटे यांनी दिले आहेत,तर अनेक काम त्यांच्या प्रभागात त्यांच्या व्यतिरिक्त जे काही नगरसेवक आहेत त्यांनीही केले आहेत. काही कामाचा उल्लेख राहुल कलाटे यांच्या कामात प्रचाराच्या सभेत किंवा प्रचार व्हिडिओमध्ये दिसत आहे. यंदा मतदारांमध्ये संभ्रम आहे कारण जे अपक्ष उमेदवार राहुल कलाट यांच्या मागे उभे होते तेच आज तब्बल २५ उमेदवार आज अपक्ष म्हणून रिंगणात आहे त्यामुळे राहुल कलाटे यांना मिळालेले एक लाख १२ हजाराचे मतदान जे ते वारंवार सांगत आहेत, ते नक्कीच कमी होणार आणि राहुल कलाटे तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला मागगे जातील असे चिञ एकंदरीत दिसत आहेत. हा जनतेचा कौल राहुल कलाटे यांना मान्य करावा लागेल. निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वांचे मन जुळवणी करून मन वळवण्यात यश मिळेल का? आणि ते कलाटे ना करावे लागेल अनेक संभ्रम कार्यकर्ते नेत्यांमध्ये आहेत.अनेक पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी राहुल कलाटे यांच्या सोबत आहेत मित्र म्हणून जरी ते त्यांच्यासोबत असले तरी त्यांच्या मनातून मात्र राहुल कलाटे यांना मतदान करतील अशी कोणतीही शाश्वती बाळगता येत नाही. त्यामुळे राहुल कलाटे यांनी कितीही ताकद आणि कितीही जोर लावला तरी मतदारांच्या मनामध्ये जागा मिळवणं मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्याकडून शक्य तितकं होणे नाही, पाहूया यंदाच्या निवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांना मतदार किती पसंती देतात हे येणाऱ्या निकालाच्या दिवशी सर्व चिंचवड विधानसभेच्या जनतेसमोर येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते जरी राहुल कलाटे यांच्या सोबत असले तरी वंचित बहुजन आघाडीला मानणारे सुज्ञ मतदार मात्र राहुल कलाटे यांना मतदान करतील का नोटा ला पसंती देतील. हे मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सर्व जनतेसमोर येईल.
Notice: Function WP_Object_Cache::add was called incorrectly. Cache key must not be an empty string. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.1.0.) in /home/u543793844/domains/prajechavikas.com/public_html/wp-includes/functions.php on line 5905 -