Home ताज्या बातम्या पुरोगामी विचारांच्या ४० संघटनाचा पाठींबा म्हणजे महाविकास आघाडीची ताकद कमी पडते का...

पुरोगामी विचारांच्या ४० संघटनाचा पाठींबा म्हणजे महाविकास आघाडीची ताकद कमी पडते का ?

96
0

चिंचवड,दि.१८ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सद्याच्या चिंचवड पोटनिवडणुकी साठी उभे असलेले उमेदवार नाना काटे यांना पुरोगामी विचाराच्या चाळीस संघटनांनी पाठिंबा दिला खरं पण त्या संघटनेच्या माध्यमातून पडणाऱ्या मतदानाला महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी मित्रपक्ष व ४० संघटनांचे मतदान झाले असे म्हणणार का किंवा निवडणूक झाल्यानंतर ह्या ४० संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेते पाठिंबा मिळवताना जो आदर सन्मान देत होते तो आदर सन्मान शेवटपर्यंत ठेवतील का ? असा सवाल मतदारांना पडला असेल.
ज्या पुरोगामी विचाराच्या संघटना आहे. ज्या शिव,फुले,शाहु,आंबेडकर चळवळीचे काम करतात अशा संघटनांना नाना काटे व नाना काटे यांची प्रचार यंत्रणा शेवटपर्यंत सन्मानाची वागणूक देऊ शकेल का? पुरोगामी विचारांचे हिंदुत्व आणि दुसरे हिंदुत्व या लढाईमध्ये नाना काटे कोणते हिंदुत्व स्वीकारतील महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला जागा सोडली त्यामुळे नाना काटे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र अनेक गोष्टीची खळबळ आणि पक्षांतर्गत अनेक लोकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे. भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, विलास लांडे, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप असे अनेक दिग्गज मान्यवर खांद्याला खांदा लावून काम करताना तर दिसत आहेत मात्र कुठेतरी मनामध्ये आमदारकीचे उमेदवारी न भेटल्याचे मनात खदखद आहे. त्यामुळे नाना काटे यांचा विजय पाहिजे तसा अवघड आहे,मात्र मिळालाच तर निसटता विजय मिळेल. कारण नाना काटे यांच्यासमोर राहुल कालाटे यांचे मोठे आव्हान आहे. राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्यामधील अंतर कमी असल्याने दोघांना मानणारा जनाधार हा जवळ जवळचा आहे.त्यामुळे पिंपळे सौदागर,वाकड,काळेवाडी, थेरगाव,राहटणी हा परिसर वगळता राहुल कलाटे आणि नाना काटे यांना मानणारा वर्ग कमी आहे.तर पक्षाचे मतदान होईल.त्यामुळे पराभवाकडे न वळता विजयाकडे काटे वाटचाल करतील अशी माफक अपेक्षा मतदारांन मध्ये आहे.

Previous articleराहुल कलाटेन वर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नेमक काय प्रकरण
Next articleराहुल कलाटे ना वंचितचा पाठिंबा चालतो, वंचितच तिकीट का चालत नाही? किंवा ते वंचित मध्ये जाहीर प्रवेश का करत नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + three =