Home ताज्या बातम्या धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एकनाथ शिंदे गटाकडे……

धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एकनाथ शिंदे गटाकडे……

0

चिंचवड,दि.१७ फेब्रुवारी २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हाच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. ANI ने याबाबतचं वृत्त दिलेय.निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला अस म्हटल जातय. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिल असुन पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु होती. निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली हे चिञ आता स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − ten =