Home ताज्या बातम्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न

86
0

पिंपरी,दि. २० डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आदरणीय लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन या ठिकाणी खास महिलांसाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर राबविण्यात आले. शिबिराचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क व एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्ष मा. सौ. सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले .याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळत असताना वैयक्तिक आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे.या शिबिरातील कॅन्सर तपासणी बाहेर केल्यास महिलांना जास्त पैसे मोजावे लागतात, परंतु पिंचि शहर महिला कार्यकारिणीने महिलांसाठी या तपासणी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत .अशा प्रकारची तपासणी शिबिरे शहरात निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून दिला पाहिजे असे सुनेञा पवार म्हणाल्या. या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट व त्यांच्या महिला कार्यकारिणीचे त्यांनी विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष संजोग वाघिरे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, निरीक्षक शितल हगवणे, माजी महापौर मोहिनी ताई लांडे, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, श्याम लांडे, राहुल भोसले, युवक अध्यक्ष इमरान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप,नगरसेविका वैशाली काळभोर,स्वाती काटे, उषाताई काळे, विश्रांती पाडाळे, सुरेखा लांडगे,अमिना पानसरे तसेच कविता खराडे, पुनम वाघ, ज्योती तापकीर ,उज्वला ढोरे, संगीता कोकणे ,ज्योती गोफणे आदी महिला कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांनी,सूत्रसंचालन पुनम वाघ यांनी तर समारोप आभार कविता खराडे यांनी मानले.सदर शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous articleआपल्या प्रभागातील समस्या आपली बातमी,हक्काचे विचारपीठ/व्यासपीठ
Next articleखंडणी प्रकरणी अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, १३ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − 1 =