Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दसऱ्याची धामधुम तर रांगोळ्यांंनी सजले सर्व विभाग

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दसऱ्याची धामधुम तर रांगोळ्यांंनी सजले सर्व विभाग

92
0

पिंपरी,दि.०४ऑक्टोबर २०२२ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- विजयादशमी व दसरा हा सण एकच मानला जात असला तरी विजयादशमीच्या मागील पौराणिक कथा वेगळी आहे. दुर्गा देवीने महाभयंकर महिषासुर राक्षसाला नऊ दिवसांच्या लढाईनंतर दहाव्या दिवशी ठार केले होते. या विजयाला साजरा करणारा दिवस म्हणजे विजयादशमी. महिषासुराच्या सेनेने जेव्हा देवतांना त्रास देत उच्छाद मांडला होता तेव्हा देवी दुर्गेने महाकाली रूपात महिषासुराला लढा देत त्याचा शिरच्छेद केला होता.

दसरा व विजयादशमीच्या निमित्ताने शक्तीचे पूजन केले जाते. श्रीराम व माता दुर्गा यांच्या रूपात अन्यायावर न्यायाने मिळवलेला विजय साजरा केला जातो. यादिवशी शस्त्र पूजनाला विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळी राजे महाराजे दशमीच्या दिनी आपल्या सैन्याच्या शस्त्रांची पूजा करत. हीच परंपरा आजही कायम आहे. यामुळे मान व प्रतिष्ठा कायम राहते अशी मान्यता आहे. युद्धाच्या मार्गाला न अवलंबता बुद्धीच्या बळावरही विजय मिळवता येतो त्यामुळे विद्येला शस्त्र मानून दसऱ्याच्या निमित्त सरस्वती पूजनालाही विशेष मान आहे. त्यामुळे सर्वञ उद्या दसरा ५ ऑक्टोबर रोजी सर्व घर कंपनी सर्व वस्तु देखील पुजल्या जातात.दसर्‍या दिवशी सर्वञ सुट्टी असते त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील देखील प्रत्येक विभागात दसर्‍याची धामधुम पाहिला मिळाली.प्रत्येक विभागाच्या दरवाज्यात महिला कर्मचारी रांगोळी काढतात व बाकी सर्व कर्मचारी मिळुन हार फुले नी कार्यालय विभाग सजवुन पुजन करतात.असाच वैद्यकीय विभागा च्या दारात महिला कर्मचार्‍यांनी एक अगळी वेगळी छान अशी रांगोळी काढली आहे त्याचे छाया चिञ प्रजेचा विकास ने टिपले आहे.वर्षा ढाके, मनीषा खेडकर, मयुरी पुराणिक, भारती दराडे, जयश्री नायडू, वंदना खंडारे, मंगला भोजने ह्या महिला कर्मचार्‍यांंनी हि रांगोळी काढली आहे.त्यांचे संंपुर्ण महापालिकेत कौतुक केले जात आहे.

Previous articleसोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांची जहरी टीका
Next articleजाहिरात म्हणजे……..?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 6 =