Home ताज्या बातम्या …..तुमचा मोबाईल नंबर द्या तुमचे पती घरी नसताना मला फोन करा महिलेची...

…..तुमचा मोबाईल नंबर द्या तुमचे पती घरी नसताना मला फोन करा महिलेची छेडछाड करत आरोपीची विचिञ मागणी

0

देहुरोड-मामुर्डी,दि.23 सप्टेंबर 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये थेट महिलेचा हात पकडून छेडछाड करत विचित्र मागणी आरोपींनी केली आहे. ममता बिल्डिंग बरलोटा नगर या ठिकाणी फिर्यादी महिला तिच्या आईच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी जात असताना बिल्डिंगच्या गेट समोरील पार्किंग मध्ये आरोपी कपिल ठोंबरे याने महिलेला अडवून फिर्यादी महिलेला तिचा मोबाईल नंबर मागितला आणि तुमचे पती घरी नसताना फोन करा, मला तुमच्याशी एकटीशी भेटायचे आहे व बोलायचे आहे असे म्हणून महिलेचा उजवा हात पकडून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
सदर घटना 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9.30 वाजता ममता बिल्डिंगच्या गेट समोरील पार्किंग मध्ये बरलोटा नगर, देहूरोड तालुका- हवेली, जिल्हा-पुणे या ठिकाणी घडली असून पिडित महिलेने फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 595/ 2022 भा.द.वि कलम 354, 354(अ) नुसार आरोपी कपिल ठोंबरे,राहणार- मामुर्डी देहूरोड तालुका हवेली जिल्हा पुणे. यावर गुन्हा दाखल झाला असून आरोपी ला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे मॅडम ह्या तपास अधिकारी असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 5 =

error: Content is protected !!
Exit mobile version