Home ताज्या बातम्या ह.भ.प. कै. दत्तात्रय मल्हारराव तरस यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ५ नोव्हेंबरला कीर्तन व महाप्रसादाचे...

ह.भ.प. कै. दत्तात्रय मल्हारराव तरस यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ५ नोव्हेंबरला कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

0

किवळे,दि.०३ नोव्हेंबर २०२६ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-किवळे येथील ह.भ.प. कै. दत्तात्रय मल्हारराव तरस यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ह.भ.प. श्री. नितीन महाराज काकडे यांचे प्रवचन व कीर्तन सेवा होणार असून, त्यानंतर भाविकांसाठी फराळ प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम मल्हार निवास, नवनाथ अपार्टमेंट्सच्या शेजारी, विकास नगर, किवळे येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवचन व कीर्तन सेवा होणार असून, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत फराळ प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

कै. दत्तात्रय मल्हारराव तरस यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तरस परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ : मल्हार निवास, नवनाथ अपार्टमेंट्स शेजारी, विकास नगर, किवळे.
दिनांक : गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६.
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
आयोजक : श्रीमती प्रमिला दत्तात्रय तरस, श्री. तुषार दत्तात्रय तरस, श्री. मंगेश दत्तात्रय तरस व सौ. लीना अजय कलाटे.
शोकाकुल : समस्त तरस परिवार व किवळे ग्रामस्थ.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version