Home ताज्या बातम्या निगडीत रंगणार ‘दिवाळी पहाट २०२६’; पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल स्वरांची रसिकांना...

निगडीत रंगणार ‘दिवाळी पहाट २०२६’; पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल स्वरांची रसिकांना मेजवानी

0
निगडी-प्राधिकरण,दि.०६ नोव्हेंबर २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- दिवाळीच्या मंगलमय पहाटेला भक्तिसंगीत आणि भावगीतांच्या सुरांनी अविस्मरणीय बनविण्यासाठी निगडी प्राधिकरण येथे ‘दिवाळी पहाट २०२६’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची गायन मैफल असणार आहे.

शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता नियोजित महापौर निवास मैदान, सेक्टर २७ अ, प्राधिकरण, निगडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. दिवाळीच्या पहाटेची सुरुवात भक्तिमय वातावरणात व्हावी, तसेच नागरिकांना दर्जेदार सांगीतिक कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनुराधा पौडवाल या भारतीय संगीतविश्वातील प्रसिद्ध गायिका असून त्यांच्या सुमधुर आवाजाने अनेक हिंदी व मराठी चित्रपटगीते, भावगीते आणि भक्तिगीते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या गायनाची अनुभूती प्रत्यक्ष घेण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील संगीतप्रेमींना मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनात माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ. शैलजा अविनाश मोरे, अनुप शैलजा अविनाश मोरे आणि अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष समीर शैलजा अविनाश मोरे यांचा पुढाकार आहे. तसेच विविध मान्यवर आणि निमंत्रकांच्या सहकार्याने या सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या पहाटे सुरांची बरसात!

दिवाळीचा उत्साह, भक्तिसंगीताची अनुभूती आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांची जादू असा त्रिवेणी संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, निगडी, प्राधिकरण आणि परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या सांगीतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रम स्थळ : नियोजित महापौर निवास मैदान, सेक्टर २७ अ, प्राधिकरण, निगडी, पुणे – ४११०४४.

दिनांक : शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६

वेळ : पहाटे ५.३० वाजता

आयोजक : अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन.

अनुप मोरे म्हणाले, “दिवाळी हा आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण आहे. या मंगलमय सणाची सुरुवात भक्तिसंगीत आणि सुरेल गीतांच्या माध्यमातून व्हावी, या संकल्पनेतून आम्ही ‘दिवाळी पहाट २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पद्मश्री अनुराधा पौडवाल यांची गायन मैफल पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय सांगीतिक पर्व ठरेल. नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version