Home ठाणे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

119
0

मुंबई, 30 जून 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.यानंतर आता भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याआधी ठाकरे सरकारने जाण्याआधी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नामांतर करण्यास परवानगी दिली आहे. राज्यात सत्तानाट्य सुरू असताना कोरोनाने चांगलाच वेग घेतल्याचे समोर आले आहे.

देशविदेशातील घडामोडी वाचा अगदी काही मिनिटांत. फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला! गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर आता भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ठाकरे सरकार कोसळलं, अखेर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा! उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. हे वृत्त अनेकांना धक्का देणारं आहे. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचा राजीनामा देखील मान्य केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

विवेक फणसाळकर यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तापदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विवेक फणसाळकर हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता राज्य मंत्रिमंडळात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झाले त्यावेळी शेकडो शिवसैनिकांनी राजभवनाबाहेर गर्दी केली. मुख्यमंत्र्यांसोबत आणखी काही मंत्रीदेखील राजभवनावर गेले होते.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्र्यांनी का दिला फ्लोर टेस्टआधीच राजीनामा? मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ होता. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. फ्लोअर टेस्ट नाही, आता पुढे काय होणार? उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. फक्त मुख्यमंत्रीपदच नाही तर त्यांनी विधानपरिषदेची आमदारकीही सोडली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता गुरूवारी बहुमताची चाचणी होणार नाही.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नवा मार्गदर्शक सूचना देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने बुधवारी कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

Previous articleदेहुरोड- सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या
Next articleदेवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारच्या मंञिमंडळामध्ये आमदार महेश लांडगेचा होणार समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + 13 =