पिंपरी-चिंचवड,दि.०५ एप्रिल २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी राज्य आणि केंद्र पातळीवर केली जात आहे. या हिंसाचाराच्या तपासासाठी सरकारने एक समिती देखील नेमली आहे. या समितीच्या तपासातून हिंसाचारात सहभागी असणाऱ्या अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत.यामध्ये ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे संस्थापक संभाजी भिडे यांचे देखील नाव आहे.मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आता संभाजी भिडे यांचे नाव भीमा कोरेगाव येथील दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आले आहे. याबाबतची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारात संभाजी भिडे यांचा देखील हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.अनिता सावळे यांनी चिंचवड पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवली व ती शिक्रापुर पोलिसांन कडे वर्ग केली त्यामुळे शिक्रापुर पोलिस ठाण्यात नोंद झाली.माञ पुणे ग्रामीण पोलिसांकडुन भिडें ना मोठा दिलासा मिळाला आहे.
या हिंसाचार प्रकरणात गेल्या वर्षीच ४१ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. मात्र या आरोपपत्रात संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. मध्यंतरी या प्रकरणात संभाजी भिडे यांची चौकशी होत नसल्याची याचिका वकील आदित्य मिश्रा यांनी केली होती.या याचिकेच्या सुनावणीदरम्यानच भीमा कोरेगाव हिंसाचारात संभाजी भिडे प्रत्यक्ष आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांचे नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचा अहवाल न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आला आहे. मात्र यापूर्वी झालेल्या तपासात संभाजी भिडे यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहे.
भीमा कोरेगाव प्रकरण नेमकं काय?
पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या एल्गार परिषदेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला, असा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले होते. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला होता.कोरेगाव-पुणे हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास करुन १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाचा सध्या तपास एनआयए करत आहे. एनआयएने २४ जानेवारी २०२० रोजी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर १४ एप्रिल रोजी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांना अटक केली.दरम्यान कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर केला होता.