देहुरोड,दि.17 एप्रिल 2022( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-किवळे उत्तम नगर लेखा फार्म च्या पाठी मागे महिला फिर्यादी अंगणात चुलीवर स्वयंपाक करत असताना तिच्या शेजारील राहणारा आरोपी सतीश काकासाहेब काकडे यांने भरधाव वेगाने मोटार सायकल नेल्याने महिलेच्या स्वयंपाकात माती उडाली व चपातीच्या पिठात माती झाली.म्हणुन फिर्यादी महिलेने एवढ्या जोरात गाडी का चालवलीस स्वयपाकात माती उडाली असे विचारले असता आरोपीने फिर्यादी महिलेस शिवराळ भाषेत शिवीगाळ केली फिर्यादीचे पतीने शिवीगाळ का करतोस बोले असता आरोपी काकडे यांने फोन करुन मिञाला बोलुन घेतले.कोयता घेऊन ये बे..चो..ला संपुवुन टाकु असे म्हणत आरोपी काकडे यांची पन्ती व मिञ या तिघांनी महिलेस व तिच्या पतीस सिमेंट ब्लाॅक आणि सिमेंट पञा व लाकडी बांबुने मारहाण करत जखमी केले. फिर्यादी महिला हिला मनास लज्जा उत्पन होईल अशा ठिकाणी जोरात पकडुन दाबत ढकलुन दिले महिला घाबरुन बेशूद्ध अवस्थेत पडली असता.पतीने पोलिसांना फोन करताच आरोपी तेथुन फरार झाले.सदरील घटना हि 11 एप्रिल 2022 रोजी 5.30 वा सुसारास घडली असु फिर्यादी महिलेने देहुरोड पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन आरोपी सतीश काकासाहेब काकडे व पन्ती किरण,आणि त्याचा मिञ यांवर देहुरोड पोलिस स्टेशन येथे गु.रजि.क्र218/2022 भा.द.वि.कलम 354,324,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी सतीश काकडे याला अटक केली असुन पुढील तपास देहुरोड पोलिस करत आहे.