Home ताज्या बातम्या स्वच्छ सर्वेक्षण-पिंपरी चिंचवडला करू नंबर वन पण आंबेडकर जयंती साजरी होत असणार्‍या...

स्वच्छ सर्वेक्षण-पिंपरी चिंचवडला करू नंबर वन पण आंबेडकर जयंती साजरी होत असणार्‍या परिसराकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

82
0

पिंपरी,दि.१२ एप्रिल २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी दिलेल्या पाठबळामुळेच दि. ४-०४-२०२२ रोजी आपल्या शहराने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये (नागरिकांच्या प्रतिसादामध्ये) देशात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.आता या पुढचा टप्पा गाठून आपले पिंपरी चिंचवड शहर देशात पहिला क्रमांक मिळवेल यासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. शहराचा नावलौकिक देशपातळीवर वाढणार आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण आपल्या शहराला देशात नंबर वन करण्याचा निर्धार करत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पर्व साजरा करण्यात येत आहे दरसाल जयंती पर्व साजरा होतो यंदाही ११ एप्रिल ते १५ एप्रिल हा साजरा होता मात्र स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीमध्ये देशात अव्वल नंबर वन बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विभाग कार्यक्रमाच्या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ संर्वेक्षणाची दिवसभर टीम व तसेच कचऱ्याचे डस्टबिन व कचऱ्याची गाडी ठेवण्याचा विसर पडला आहे. याकडे प्रशासन व जनसंपर्क अधिकारी व त्यांच्या आजूबाजूला लुडबुड करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही याचा विसर पडला आहे जयंती म्हटलं कि पाच दिवस शहरातील नागरिक या ठिकाणी येणारच मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी थंड पेय त्याची विक्री होते तर काही लोक अन्नदान करतात मात्र हा सारा कचरा एकत्रित ठेवून कचरा गाडी पर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी कचऱ्याचे डबे नाही. आणि स्वच्छ सर्वेक्षण महापालिकेच्यावतीने दिंडी पालखी च्या वेळेस सफाई कर्मचाऱ्यांची टीम दिले जाते तसेच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सहा डिसेंबर रोजी दिवसभर चैत्यभूमीच्या परिसरामध्ये सफाई कर्मचारी व कचरा गाडी दिले जातात मात्र पिंपरी-चिंचवडच्या प्रशासनला मिटिंग मध्ये सांगूनही विसर पडला आहे त्यामुळे जयंती साजरी होत असणाऱ्या परिसरात कचरा अस्ताव्यस्त प्रमाणात दिसत आहे आहे महापालिका प्रशासन याकडे लक्ष देऊन स्वच्छ संरक्षणाचे टीम त्या ठिकाणी देणार का असा प्रश्न सर्व जनतेला पडला आहे.

Previous articleविकास नगर किवळे गणपती मंदिराच्या शेजारी दुकानांना आचानक लागली आग
Next articleस्त्री मुक्तीचे प्रयोगशील समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकर”-डॉ. भारती चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × two =