Home ताज्या बातम्या “1एप्रिल”रिझर्व्ह बँकेची स्थापना ; डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

“1एप्रिल”रिझर्व्ह बँकेची स्थापना ; डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

180
0

देहुरोड,दि.01 एप्रील 2022(प्रजेचा विकास न्युज- विशेष लेख):-       रिझर्व्ह बँकेची स्थापना

हिल्टन यंग कमिशननं त्यांच्या अहवालात केलेल्या सूचनांचा स्वीकार करुन तत्कालिन ब्रिटिश सरकारनं 1927 मध्ये ‘रिझर्व्ह बँक बिल’ आणलं. या बँकेला बाजारात चलन जारी करण्याचे अधिकार होते आणि तिची स्वायतत्ता टिकवण्यासाठी तिच्या व्यवस्थापनावर राजकीय व्यक्तींच्या नेमणुका करता येणार नव्हत्या.पण अनेक मतमतांतरं असल्यानं हे विधेयक लगेच संमत झालं नाही. 1928 मध्ये सुधारित विधेयक आणलं गेलं, पण तरीही बराच काळ वाद होत राहिला.1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा भारतातल्या राजकीय सुधारणांची आणि अधिकारांची चर्चा सुरु झाली, तेव्हा त्यात राजकीय अधिकारांबरोबर आर्थिक अधिकारांमध्ये केंद्रीय रिझर्व्ह बँकेची निर्मितीही पूरक मानली गेली.पुन्हा एकदा 1933 मध्ये हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशींवर आधारित ‘द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बिल 1933’ हे आणलं गेलं आणि 6 मार्च 1934 ते गव्हर्नर जनरलच्या सहीनं कायद्यात रुपांतरित झालं. त्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ अस्तित्वात आली.ही शिखर बँक अस्तिवात येण्याअगोदर भारतीय बँकिंग व्यवस्था मोठ्या घुसळणीतून गेली होती. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे अर्थविचार आणि त्यांची भूमिका अशा प्रकारे आजही भारतीय बँकिंग व्यवस्थेचा कणा असलेल्या या संस्थेच्या स्थापनेला कारणीभूत ठरले.

1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 96 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच कोणी तरी लाटत आहेत.त्यांचे ते कार्य प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचावे. त्यांच्या अद्वितीय आणि महत्वपुर्ण कार्याचा आढावा घेणारा हा विस्तृत लेख.

                
कोणीही एप्रिल फुल चे मॅसेज पाठवू नये

खरं तर 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फुल नाही तर डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी  लिहिलेला एक  ग्रंथ  “the problem of the rupee” या ग्रंथाचा आधार घेऊन  1 एप्रिल 1935 या दिवशी ” reserve bank of india” बाबासाहेबानी या बँकेची ची स्थापना करून 01 एप्रिल ते 31 मार्च  हा आर्थिक कालावधी ठरवला, बाबासाहेबानी देशासाठी केलेले एक हे महान कार्य आहे, त्यामुळे 1 एप्रिलपासून  आर्थिक वर्षाची सुरुवात होते आहे आणि हि गोष्ट मनुवादी लोकांना पटली (पचली) नाही म्हणून  त्यांनी 1 एप्रिल हा दिवस मूर्खपणाचा दिवस म्हणून साजरा करायला लावला, म्हणून सर्वांनी याचा तार्किक विचार करून एप्रिल फुल्ल हा दिवस साजरा करू नये .

1)भारताची चलन व्यवस्थेचे मार्गदर्शक.1923/1925
2)भारतीय रिजर्व बँकेच्या स्थापणेचे मार्गदर्शक.1934
3)भारताचे संविधान लेखक.1949
4)भारतीय 14 वित्त आयोगाचे दिशादर्शक.1951– डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
वरील 4 गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत.
आणि त्या सर्व गोष्टींचा पाया हा बाबासाहेबांचे विचार आणि लिखाण आहे.
वरील 4 गोष्टींवरती आजपर्यंतचा भारताचा अर्थ कारभार आणि येनारा भविष्यातील अर्थ कारभार अवलंबुन आहे.

1)The problem of the rupee:Its origin and its solution.1923 – Dr.Babasaheb Ambedkar

ह्या पदवी साठी “लंडन स्कुल ऑफ ईकोनाॅमिक्स” ह्या विश्वविद्यालयात शिकत असताना लिहलेला प्रबंध.
या आपल्या प्रबंधात डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांनी
“चलन” दर दहा वर्षानी बदलने आणि ते अचानक बदलने.
हे मुद्दे 96 वर्षापूर्वीच लिहून ठेवले आहेत.
ज्यामुळे भ्रष्टाचार आणि ब्लैकमनी रोखता येऊ शकतो असे ईशारे त्यांनी अगोदरच दिलेले आहेत.
2)Reserve Bank Of India.1934 – Dr.Babasaheb Ambedkar
भारतीय रिझर्व बँकेची स्थापना हि ब्रिटीश काळात
Reserve Bank Of India Act 1934 साली झाली.
त्या पुर्वी 1926 साली
Royal Commission on Indian Currency and Finance, also known as the Hilton–Young Commission.
हे कमिशन भारतात रिजर्व बँकेच्या स्थापनेसाठी इग्लंड हुन भारतात आले होते
Reserve Bank Of India.
ची संकलपणा,मार्गदर्शक तत्वे,कार्यपद्धती व दृष्टीकोण हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी “हिल्टन यंग कमिशन” ला 1926 साली दिलेली साक्ष ह्या वरतीच आहे .
पुढे रिजर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1935 साली झाली.
त्या “हिल्टन यंग कमिशन” मधील जो प्रत्येक पदाधिकारी होता त्याच्या प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचे “The problem of the rupee its origin and its solution” हेच पुस्तक होते.
3)
“Finance Commission of India.1951
“भारतीय वित्त आयोग”
“भारतीय वित्त आयोग” ची स्थापण 1951 साली झाली.
भारतीय वित्त आयोगाचे काम हे आहे कि देशातील केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही घटकांमध्ये भारत सरकारकडे येना-या सर्व करांच्या स्वरूपातील महसुल आणि ईतर ठिकाणांहुन येनारा महसुल हा खुप मोठ्या प्रमाणात केंद्रा कडे पैश्याच्या स्वरूपातुन जमा होतो.
तर त्याचे प्रत्येक 5 वर्षांनी व्यवस्थापण करणे गरजेचे असते.
Finance Commission Of India ची स्थापण ही.
THE EVOLUTION OF PROVINCIAL FINANCE IN BRITISH INDIA.1925- Dr.Babasaheb Ambedkar

हा बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापिठा मध्ये Phd साठी चा प्रबंध आहे
ह्या प्रबंधा च्या आधारेच भारतीय वित्त आयोगाची स्थापणा झाली आहे.आणि आज पर्यंत सर्व 14 वित्त आयोग हे त्याच पुस्तकाच्या आधारे करन्यात आले आहेत.
ही माहीती तर भारतातील अर्थतज्ञांना पण अजुन ज्ञात नाही आहे तर लोकांना ती कधी समजनार हिच मोठी शोकांतीका आहे.
बाबासाहेब हे भारतातील अर्थतज्ञांपैकी सर्वाधिक जास्त शिकलेले ते ही जगातील सर्वोच्च विद्यापीठांतुन अर्थशास्त्र ह्या विषयांत सर्वाधिक जास्त पिएचडी केलेले एकमेव व्यक्ती आहेत.
मला आवर्जुन सांगायचे आहे कि हे सर्व लिखान त्यांनी जवळपास शंभर वर्षांपुर्वी केलेले आहे आणि त्या जमान्यात.
टि.व्ही,इंटरनेट,मोबाईल,काॅम्पुटर ह्या सोई सुविधा जन्मल्या नव्हत्या.
तरी सुद्धा बाबासाहेबांनी जगातिल सर्वाधिक सुंदर अर्थशास्त्रात लिखान केले आहे.
येणार्या कित्येक वर्षापर्यंत ह्या लिखाणाला महत्व असेल..
सरकार कितीही बदलतील पण त्या सरकारचे मार्गदर्शक हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच असतील यात अजिबात शंका नाही .
आधुनिक भारताच्या नवनिर्मात्याला विनम्र अभिवादन !!

Previous articleरोहीदास तरस यांना 1 कोटी 30 लाखाला गंडा,बिल्डर अगरवाल विरोधात गुन्हा दाखल;तिघ अटकेत
Next articleविकास नगर किवळे गणपती मंदिराच्या शेजारी दुकानांना आचानक लागली आग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × five =