Home ताज्या बातम्या दिपकभाऊ मधुकर भोंडवे आयोजीत नोकरी महोत्सवात 1500 उमेदवारांचा सहभाग 800 जणांना ऑफर...

दिपकभाऊ मधुकर भोंडवे आयोजीत नोकरी महोत्सवात 1500 उमेदवारांचा सहभाग 800 जणांना ऑफर लेटर

0

रावेत,दि.13 मार्च 2022(मिडिया प्रतिनिधी):- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी दिपकभाऊ मधुकर भोंडवे यांनी उपलब्ध करुन दिली. रावेत येथील श्री.दिपक मधुकर भोंडवे युवा मंचच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले,दिपकभाऊ भोंडवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले व सर्व कंपनी प्रतिनिधीनचा सत्कार करण्यात आले सूत्रसंचालन दिग्दर्शक निर्माते गायक विजय पानसरे यांनी केले अशी माहिती सचिव संतोष भोंडवे यांनी दिली.

देहूरोड-कात्रज हायवेवरील रावेतच्या समीर लाॅन्समध्ये रविवार,दि.13 मार्च रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत नोकरी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात 51 नामांकित कंपन्याचा सहभाग होता.nice grow,Job Connect,Accenture,TATA,Mahindra CI,BVG,GTT,Hyundai,LIC,Globel अशा नामांकीत कंपन्याचा म्हत्वाचा सहभाग ठरला, मॅन्युफॅक्चरिंग, फायन्सान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बॅंकिंग, इन्शुरन्स, हाॅस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकाॅम व इतर आय.टी., बी.पी.ओ., के.पी.ओ., फार्मा अशा क्षेत्रात युवक-युवतींना संधी उपल्बध केल्यामुळे नोकरी साठी आलेल्या सर्वान मध्ये आनदी वातावरण होते.
स्वताःचा बायोडाटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी कागदपञासह नोकरीसाठी उमेदवार आले होते, आठवी ते दहावी, बारावी, बी.ए., एम.ए., एम.काॅम., बी.एस.सी., एम.एस.सी., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए., आय.टी.आय., बी.ई., अशा आॅल फॅकल्टीतील डिप्लोमा, सिव्हिल, पदवीधर व पदव्युत्तर या सर्वांनी नोकरी महोत्सवाचा लाभ घेतला,1500 उमेदवारांनी रजिस्र्टेशन केले.तर 839 उमेदवारांना ऑफर लेटर व जाॅंईनिंग लेटर देण्यात आले.जाॅब कनेक्टचे प्रमुख आर.एम.गायकवाड,रिया देशपांडे,अंजली पांचाळ व 200 जणांची HR टिम आली होती,या सर्वांचे आयोजन आर.एम गायकवाड हे पाहत होते.यावेळी सोमनाथ भोंडवे, संतोष भोंडवे, अभिजित भोंडवे,अध्यक्ष-सुनील भोंडवे, आर के सिंग, धनंजय शुक्ला, अनिरुद्ध खंडाळे, वैभव देशमुख, निखिल जाधव,संजय राठोड,रत्नाकर कंरकाळ, अमोल भोंडवे, संतोषआप्पा भोंडवे, श्रीकांत नवले, विकास कडलक, रमेश शिंदे, योगेश ढेंबरे ,संतोष सक्सेना ,राजवर्धन भोंडवे, दत्ता जगताप, अमोल नांगरे, हनुमंत मुरकुटे, गोपीचंद पावरा ,सुजित शिंगारे, प्रतीक करोडे, अमोल देशपांडे, बजरंग कांबळे, धरमसिंग राठोड व श्री दिपक भाऊ भोंडवे युवा मंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleImpact-प्रजेचा विकास च्या बातमीचा दणका ; छत्रपती शिवाजी महाराज चौक विकास नगर येथील काढले बॅनर
Next articleअखेर प्रभागरचना रद्द ; निवडणुका लांबणीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three − 2 =