Home ताज्या बातम्या Impact-प्रजेचा विकास च्या बातमीचा दणका ; छत्रपती शिवाजी महाराज चौक विकास नगर...

Impact-प्रजेचा विकास च्या बातमीचा दणका ; छत्रपती शिवाजी महाराज चौक विकास नगर येथील काढले बॅनर

0

विकासनगर-किवळे,दि.12 मार्च 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रजेचा विकास ने बातमी लावल्यानंतर ती बातमी वायरल झाली आणि तासाभरातच बॅनर काढण्यात आला.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाने तासाभरातच येऊन बॅनर काढला.

तसेच सर्व विकासनगर मधील दिशा दर्शक नाम फलक मोकळे केले.मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड झाकला जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी कोणी जर परत असे बॅनर लावतानी दिसले तर त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी सांगा की दिशादर्शक आणि महापुरुषांची नावे झाकणार नाही असा तुमचा बॅनर लावा.चौकाची पहाणी देहुरोड पोलिसांनी हि केली व पुन्हा बॅनर कोणी लावताना आढळल्यास कारवाई केली जाईल.व ताबडतोब माहिती कळवा असे सांगण्यात आले.विकास नगर किवळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या नावाचा लोखंडी बोर्ड लावलेला असताना विविध पक्ष संघटना,व्यापारी त्यावरच बॅनर लावतात.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच नाव असणारा बोर्ड झाकला जातो. आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कार्यक्रम करतात घोषणा देतात.माञ कुणी विटंबना केली तर आपण त्यावर आवाज उचलतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच नाव असलेला चौकातला बोर्ड झाकुन त्यावर विविध लोक स्वताच्या नावासाठी जाहिरात बॅनरबाजी करुन महापुरुषाचा नावाचा अपमान करतात.हि खेदजनक घटना विकास रिक्षा संघटनेच्या चौकात वारंवार घडत असल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच संपूर्ण प्रभाग क्रमांक 24 नव्याने झालेल्या व जुना प्रभाग क्रमांक 16 विकास नगर किवळे रावेत मामुर्डी या ठिकाणी अनेक दिशादर्शक हे व्यापारी जाहिरितदार व आजी माजी भावी नगरसेवकांच्या जाहिरातबाजी मुळे झाकले जातात त्यामुळे शहराचे प्रभागाचे विद्रुपीकरण पहावयास मिळते. यावर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते आवाज उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.अनेक वेळा सांगुनही महापुरुषांचे नावे असलेले बोर्ड व शहरातील प्रभागातील दिशा दर्शक बोर्ड झाकले जातात.अनेक वेळा फक्त रिक्षा संघटनेचे रिक्षा चालक महाराजांच नाव झाकु नका या पेक्षा महाराजांची बदनामी दुसरी नाही असे सांगुनही वारंवार लोक महाराजांचा अपमान करतात.शेजारीच माजी नगरसेवक मनोज खानोलकर व शिवसेनेचे युवा नेते भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांचे कार्यालय देखील आहे तरीही त्यांचं या घटनेकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक नागरिकांनी याबद्दल दुःख व्यक्त केले पण सांगूनही ऐकत नसल्याचे पाहवयास मिळते.माञ यावेळेस महापालिका प्रशासन कडुन कारवाई करत फ्लेक्स काढण्यात आला.असा पुन्हा कुणी फ्लेक्स लावल्यास पालिका प्रशासनाकडून जरब बसणे खूप गरजेचे आहे.यामुळे मोठी दंगल ही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी व जाहिरातबाजी करणाऱ्यांनी याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.बॅनर लावताना महापुरषांची नावे व दिशादर्शक बोर्ड झाकले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

 

Previous articleविकास नगर- छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्डावर बॅनर बांधुन केली जातीय महाराजांची विटंबना
Next articleदिपकभाऊ मधुकर भोंडवे आयोजीत नोकरी महोत्सवात 1500 उमेदवारांचा सहभाग 800 जणांना ऑफर लेटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two − 2 =