Home ताज्या बातम्या चाकण-आदर्शगाव कान्हेवाडीच्या पोलिस पाटलांने साथीदारांसोबत मिळुन केला एकाचा खुन

चाकण-आदर्शगाव कान्हेवाडीच्या पोलिस पाटलांने साथीदारांसोबत मिळुन केला एकाचा खुन

103
0

कान्हेवाडी-चाकण,दि.१० डिसेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- किरकोळ कारणावरून कोयत्याने सपासप वार करून एकाचा खून झाल्याची घटना आदर्श गाव कान्हेवाडी (ता. खेड) येथे बुधवारी दि.८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे या घटनेत खुद्द आदर्श गाव कान्हेवाडीच्या पोलीस पाटलाने साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याची बाब समोर आली आहे.म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत कान्हेवाडी तर्फे चाकण या गावात मनोज सहादु येवले यांच्या राहत्या घरासमोर गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी एकाचा कोयत्याने वार करत खून केला आहे. गुरुवारी दिवसभर याबाबतीत काहीही चर्चा झाली नाही; मात्र सायंकाळच्या सुमारास सोशल माध्यमांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. गुन्हा रजि.१५०२/२०२१ भा.द.वि कलम३०२,३०७,३४,१०९,३४१,आर्म अ‍ॅक्ट ४(२७),मुपो अ‍ॅक्ट १३५,क्रिमीनल लाॅ अमिटमेंट अ‍ॅक्ट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करून पोलीस पाटलासह तिघांना अटक केली आहे.मयत-दिनेश मच्छिंद्र बहीरट (वय ३६, रा. कान्हेवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयूर दगडू येवले(वय-२८) राहणार कान्हेवाडी यांनी या प्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस पाटील राजेश येवले याच्यासह ओंकार ढोरे, प्रसाद येवले (सर्व रा. कान्हेवाडी, ता. खेड) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलिस करत आहेत.

Previous articleमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील भारत साकार करण्याचे मिशन पूर्ण करण्याचा निर्धार करूया – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
Next articleअभिनेञी ईशा केसकर मुकाई चौक किवळे येथे भावी नगरसेवक दिपक भोंडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × one =