Home ताज्या बातम्या शेतकर्याचे प्रश्न सोडवा,खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी बरखास्त करा:- हरेशभाई देखणे

शेतकर्याचे प्रश्न सोडवा,खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी बरखास्त करा:- हरेशभाई देखणे

0

पुणे,३१ ऑक्टोबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात दि.३१ ऑक्टोबर ला धरणे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाचे राज्य सचिव हरेशभाई देखणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. खेड सेझ प्रकल्प २००८ मध्ये अस्तित्वात आला. हा प्रकल्प प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांचा असून या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील खेड व शिरूर तालुक्यातील कनेरसर, निमगाव, दावडी ,केंदूर ,गोसासी,गावांची मिळून १२२५ हेक्‍टर जमीन हेक्टरी१७ लाख ५० हजार दराने संपादित करण्यात आली असुन जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे. म्हणून १५ टक्के परतावा विकसित प्लॉटच्या स्वरूपात देण्याचे पॅकेजमध्ये मान्य करण्यात आले. व त्यासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यातून २५% रक्कम कपात करण्यात आली आहे. नंतर पंधरा टक्के परतावा विकसित प्लॉटच्या स्वरूपात न देता विकसनासाठी कपात २५% रकमेचे शेअर्स मध्ये रूपांतर करून खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी (शेतकर्‍यांची कंपनी) स्थापन करण्यात आली. ही कंपनी स्थापन होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही या कंपनीचे कामकाज फक्त कागदोपत्री वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे. व खर्चाला मंजुरी देणे. एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. ही कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकरी असंतुष्ट असून ही कंपनीच नको अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

शेतकऱ्यांनी आपला पंधरा टक्के परतावा मिळावा. व खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी बरखास्त करावी. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली‌. परंतु शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पंधरा टक्के परतावा मिळाला नाही.
शेतकऱ्यांची अशी भूमिका आहे की, खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी बरखास्त करून शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे विकसित प्लॉट किंवा चालू बाजारभावाच्या चारपट दराने रोख स्वरूपात परतावा देण्यात यावा‌. एम.आय.डी.सी. मार्फत खेड सेझ साठी जमीन संपादन झालेले असल्यामुळे शासनानेच याबाबतीत ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
१) खेड सेझ प्रकल्पातील १५ टक्के परतावा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.
२) १५ टक्के परतावा प्रश्न मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या, अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री, एम.आय.डी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी, के.ई आय.पी.एल. प्रतिनिधी, के.डी. एल. प्रतिनिधी आणि १५ टक्के परतावा धारक शेतकरी प्रतिनिधी, यांची त्वरित संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा.
३) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी.
४) खेड सेझ प्रकल्पाचे सर्वेसर्वा उद्योजक बाबा कल्याणी यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकी संदर्भात चौकशी करावी व कारवाई व्हावी.
५) खेड सेझ प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पॅकेजची पूर्तता व्हावी.
६) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी कडे हस्तांतरित होणाऱ्या जमिनीचा व्यवहार शासकीय पातळीवरच व्हावा खाजगी पातळीवर होऊ नये.
७) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरित होणारी जमीन शासनाने एम. आय. डी. सी. मार्फत ताब्यात घेऊन विकसित प्लॉट किंवा शासकीय दराच्या चारपट दराने मोबदला द्यावा.
८) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी के.ई.आय.पी.एल. कंपनी यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करार त्वरित रद्द करण्यात यावा.
९) खेड सेझ प्रकल्पासाठी 2००८ मध्ये जमीन संपादन झालेले आहे. सेझ कायदा रद्द करण्यात आला आहे . याशिवाय दिलेल्या पाच वर्षाच्या मदती प्रकल्प उभा राहिला नाही. त्यामुळे संपादित जमिनीत मूळ शेतकऱ्यांना त्यांच्या विनामोबदला परत कराव्यात.
१०) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या नावे हस्तांतरित होणारी जमीन ही शेतकऱ्यांच्या पसंतीची असावी.
११) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी बरखास्त करावी.
खेड सेझ१५टक्के परतावा प्रश्न गेली १२वर्षे प्रलंबित असून या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री, एम. आय .डी .सी.मुख्य कार्यकारी अधिकारी, के.ई.आय.पी.एल .प्रतिनिधी, के.डी. एल. प्रतिनिधी, पंधरा टक्के परतावा धारक शेतकरी प्रतिनिधी, यांची संयुक्त मीटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावावा

या वेळी उपस्थित आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष तथा अध्यक्ष पुणे रि.श्र.ब्रि मा.विष्णु भोसले हे होते. या आंदोलनाच्या वेळी मा.संगिताताई आठवले ,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी, मा.सतिश केदारी महाराष्ट्र अध्यक्ष रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड,महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष ,प.महाराष्ट्र ,श्रीकांत कदम संपर्कप्रमुख पुणे,अजिज शेख अध्यक्ष वाहतुक आघाडी,पंढरीनाथ जाधव जिल्हाध्यक्ष,खाजाभाई शेख उपाध्यक्ष महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडी,अरुण सोनवणे महा.सहसचिव ,रि.श्र.ब्रि, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष स्वप्निल कांबळे,सत्तार शेख उपाध्यक्ष प.महाराष्ट्र रि.श्र.ब्रि, शकुर शेख जिल्हा उपाध्यक्ष, पुरुषोत्तम पवार अध्यक्ष पारधी आघाडी, हलिमा शेख (उपाध्यक्ष अल्पसंख्याक आ.) आरती साठे (रिपाइं नेत्या), रानी बेलके,उपाध्यक्ष प.महा. महिला आ. दिपक धेंडे प्रसिध्दिप्रमुख, विजय अोव्हाळ सरचिटणीस भोर ता. , काशिनाथ हजारे शेतकरी नेते, बाळसाहेब माशेरे शेतकरी नेते,भानुदास नेटके ,रुषिकेश चव्हाण ,दिलिप पालवे,शेतकरी नेते तसेच मोठ्या संख्येने बाधित शेतकरी वर्ग उपस्थित होता.

Previous articleजात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे करावी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
Next articleपिंपळे गुरव मध्ये ०७ नोव्हेंबर ला दिपावली निमित्त जल्लोष शिव भिम गीतांचा कार्यक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 5 =