Home ताज्या बातम्या दिघी-बोपखेलमध्ये नवरात्री नवरंग उत्सव स्पर्धा; प्रत्येक सहभागी महिलेला मिळणार भेटवस्तू

दिघी-बोपखेलमध्ये नवरात्री नवरंग उत्सव स्पर्धा; प्रत्येक सहभागी महिलेला मिळणार भेटवस्तू

86
0
पिंपरी, 07 ऑक्टोबर 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-विक्रम कांबळे) :– शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. त्यानिमित्ताने उपमहापौर हिराबाई घुले यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 4 दिघी-बोपखेल मधील महिलांसाठी नवरात्री नवरंग उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रत्येक सहभागी महिलेला भेटवस्तू दिली जाणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध नऊ रंगाचे पारंपरिक वेशभूषा (साडी) परिधान करुन महिला स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात.
नवरात्रीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काही नियम आहेत. स्पर्धेत एका ग्रुपला एकच दिवस सहभागी होता येईल. एकच रंग निवडता येईल आणि एका महिलेला एका ग्रुप मध्येच सहभागी होता येईल. ग्रूपमध्ये 20 पेक्षा जास्त महिला नसाव्यात. कमीत कमी 10 महिला असाव्यात. गृहनिर्माण सोसायटी, कॉलनी, बचत गट, ग्रुप बनवून सहभागी होउ शकतात.
तारखेनुसार ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या रंगाची वेशभूषा असणे आवश्यक आहे. महिलांचा ग्रुप फोटो त्यांच्या ग्रुपच्या ठिकाणी उपमहापौरांसोबत काढण्यात येईल. ग्रुप मधील सहभागी महिलांच्या नावाची यादी मोबाईल क्रमांकसह बनवून द्यायची जबाबदारी ग्रुप प्रमुखाची राहील. बक्षीसासाठी 5 क्रमांक काढण्यात येतील. तर, स्पर्धेत  सहभागी प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांचे जनसंपर्क कार्यालय, अधिक माहितीसाठी 8805418787, 8830138515 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Previous articleमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती विजयाची पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरावृत्ती होईल – संजोग वाघेरे पाटील
Next article11 महिण्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी कैलास कदम यांची वर्णी
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × four =