Home ताज्या बातम्या 11 महिण्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी कैलास कदम यांची वर्णी

11 महिण्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी कैलास कदम यांची वर्णी

0

पिंपरी,दि.07 ऑक्टोबर 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-विक्रम कांबळे) :– तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 11 नोव्हेंबर 2020 रोजी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गेली 11 महिने शहराध्यक्ष पद एक प्रकारे रिक्त होते. पण तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे त्यांच्याकडेच जबाबदारी दिली होती. साठे यांची राज्य कार्यकारिणीत सचिवपदी वर्णी लागली.

त्यानंतर काँग्रेसने शहराध्यक्षपदी कैलास कदम यांची निवड केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांची निवड महत्वाची मानली जात आहे. अशी चर्चा शहरातील राजकारणात सुरु आहे.

कदम यांनी कामगार क्षेत्रात अतिशय मोलाचे काम केले आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्या पदावर काम केले आहे. ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + four =