Home ताज्या बातम्या शहरातील भटक्या कुञ्यांच्या ठेकेदारांवर पालिकेतील पशुवैद्यकीय विभागाची मेहरबानी

शहरातील भटक्या कुञ्यांच्या ठेकेदारांवर पालिकेतील पशुवैद्यकीय विभागाची मेहरबानी

132
0

पिंपरी,दि.22 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सध्या भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता असुन. गेल्या साडेचार वर्षात भाजप शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. माञ स्मार्ट शहर करता करता भाजपने शहरातील ठेकेदारांनाच स्मार्ट केले आहे,त्यामुळे भटक्या कुञ्यांनाच स्मार्ट पणा आला आहे.भटकी कुञी पकडण्यासाठी एकाच गाडीच्या साह्याने शहरातील हजारो भटकी कुत्रे पकडली जातात. माञ; याउलट भटके कुत्रे पकडण्याची जबाबदारी ज्या ठेकेदारांवर दिली आहे ते खासगी ठेकेदार संस्थां कोट्यवधी रुपये खर्चून भटकी कुत्री कागदावरच पकडली जात आहेत. दरम्यान, कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण व नसबंदी केल्यानंतर त्यांना त्याच भागात परत सोडणे महापालिकेस बंधनकारक आहे.त्यामुळे शहरात गुंडाची दहशत कमी पण भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढली आहे.नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याने नागरिकही भटक्याकुञ्यांमुळे ञासले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुञ्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दिवसाला रुग्णालयातील आकडेवारीनुसार 25 ते 30 भटक्या कुञ्यांनी चावा घेतलेल्या घटना घडत आहेत.
महापालिकेकडून ठोस कार्यवाही होत नसल्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ अरूण दगडे यांच्या नाकारत्यापणामुळे बेजाबाबदार पणाने ठेकेदारांवर कारवाई होताना दिसत नाही. या विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद आहे. पण भटक्‍या कुत्र्यांना आटोक्‍यात आणण्यात माञ अपयश आले आहे.

हा सर्व प्रकार भटके कुत्रे पकडणारे ठेकेदार डोळे उघडे ठेवून बिनधास्त पालिकेत फिरतात. अशा ठेकेदारांवर सत्तेत असाणारे भाजप मात्र कारवाई करताना दिसत नाही. या ठेकेदारांवर पालिकेतील सत्ताधारी भाजप व पशुवैद्यकीय विभाग मेहरबान असतील तर सामान्य माणसाच्या जीवाची किंमत देखील ठेकेदाराला बहाल करावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्त राजेश पाटील यांनीही जर लक्ष दिले तर सामान्य माणसाच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई होऊ शकते. भटक्या कुञ्यांची संख्या आटोक्यात येऊ शकते,तरतूद आहे.पण भटक्‍या कुत्र्यांना आटोक्‍यात आणण्यात अपयश आले आहे.
नागरिक या मुळे भयभीत आहेत माॅर्निंग वाॅक ला सुद्धा जाता येत नाही कामगार नगरी असल्याने कामगार राञीचे कामावरुन घरी जातात,माञ भटक्या कुञ्यांच्या मुळे जीव मुठीत घेऊन घरी जावे लागते.पशवैद्यकीय विभागाने उदासिन भुमिका सोडावी,आणि कारवाही करावे अशी नागरिकांचे म्हणे आहे.त्यामुळे भटकी कुञी हा नागरिकांच्या रोषातील चर्चेचा विषय बनला आहे

Previous articleबहुसदस्यीय प्रभाग पध्दतीस वंचितचा विरोध;या मुळे संविधानाची पायमल्ली-शहरध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे
Next article‘जन आक्रोश आंदोलन’ फक्त शेतकरी आणि कामगारांचे नसून समाजातील सर्व घटकांचे प्रातिनिधीक आंदोलन – डॉ. कैलास कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 17 =