Home ताज्या बातम्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले;प्रधानमंत्री-मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले;प्रधानमंत्री-मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद

32
0

मुंबई, दि.8 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

Previous articleरोगमुक्तीचा चढता आलेख कायम ठेवत गेल्या 24 तासांत 3.18 लाखांहून जास्त रुग्ण बरे झाले
Next articleनरेंद्र मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘चि’ दिले- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − twelve =