Home ताज्या बातम्या महिन्याभरात दहा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट्ये – महापौर उषा...

महिन्याभरात दहा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट्ये – महापौर उषा उर्फ माई ढोरे

76
0

पिंपरी,दि.२३ एप्रिल २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातुन देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनेकविध उपाययोजना केल्या जात आहे. येत्या १ मे पासुन देशातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे धोरण केंद्रसरकारने जाहिर केलेले आहे. त्यानुसार महिन्याभरात पिंपरी चिंचवड शहरातील दहा लाख नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनात शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, स्थायी समिती सभापती ॲड नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये ‍विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातुन बाहेर काढण्यासाठी महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. केंद्र सरकारने दि. १ मे २०२१ पासून १८ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सध्यस्थितीला ४५ वर्षांपुढील सुमारे ३ लाख नागरिकांना यशस्वीपणे लसीकरण झाले आहे. आगामी काळात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील संपूर्ण नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असुन पुढील महिन्याभराच्या कालावधीत सुमारे १० लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. यासाठी शहरात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त प्रभागनिहाय प्रत्येकी चार असे आणखीन ६० अतिरिक्त केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. नागरिकांना ने-आण करण्यासाठी रिक्षा वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगरसेवक व प्रशासन प्रतिनिधी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असुन प्रतिकेंद्र २०० लोकांची नोंदणी करुन लसीकरण करण्यात येणार आहे. सद्या शहराला दर दिवसा १८ ते २० हजार लस उपलब्ध होतात. १ मे पासुन ४० ते ५० हजार लस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन काळात या मोहिमेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच लसीकरण ठिकाणी गर्दी होवू नये, सुरळीतपणे लसीकरण व्हावे यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.

या बैठकीमध्ये प्लाझ्मादान, रक्तदान, लसीकरण मोहीम याबाबत जनजागृती, समस्या निराकरण व उपाययोजना, शवदाहिका वाढविणे, ऑक्सिजनसाठी नियंत्रण टीम तयार करणे, शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे, वैद्यकीय सेवा पुरविताना लॉकडाऊनचे नियम पाळणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या कामांसंदर्भात प्रशासनाच्या मदतीला नगरसेवकांची टिम असणार आहे. तसेच उपस्थित नगरसेवक पदाधिका-यांनी आवश्यक त्या सुचना आयुक्त यांना केल्या. कोरोना काळात नागरिकांनी सर्वप्रथम स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर रहावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केले.

Previous articleदेवेंद्रजी फडणवीस,राज्यातील जनतेशी बांधिलकी जपा, जनतेसाठी केंद्राशी दोन हात करायला पुढे या – नाना पटोले
Next articleBraking-पिंपरी-बी आर टी रोड मधुन परवानगी नसतानाही घातला ट्रक व केली सरकारी मालमत्तेची नुकसान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − nine =